आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधीची कमतरता:खातखेडच्या जि. प. शाळेत विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप ; विद्यार्थ्यांची गैरसोय

शेगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील खातखेड येथील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले. शाळेत शिकत असताना विद्यार्थ्यांची गणवेश उपलब्ध नसल्यामुळे येथील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, या उदात्त हेतूने बोंडगावचे सरपंच रामा पाटील थारकर यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना गणेशाचे वाटप केले.

खातखेड येथील शाळेला इमारत, सुरक्षा भिंत, स्वच्छतागृहे, डिजिटल शाळेसाठी संगणक, फर्निचर या सुविधा उपलब्ध करून देऊन आतापर्यंत शाळेच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली नाही. त्याप्रमाणे भविष्यातही असेच कार्य व मदत शाळेला मिळत रहावी, अशी अपेक्षा मुख्याध्यापक घुले यांनी व्यक्त केली. दरम्यान शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा सरपंच रामा पाटील थारकर यांनी शाळेतील आवाराची व स्थितीची पाहणी करून आवश्यक गरजांचा आढावा घेतला व त्या गरजा पूर्ण करण्याचे आश्वासन देखील यावेळी दिले. गणवेश वाटपप्रसंगी सोनटक्के, कात्रे, शाळा समिती अध्यक्ष विनायक इलामे, बोंद्रे, मुख्याध्यापक घुले उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...