आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:जिल्ह्याचा दहावीचा निकाल 96.39 टक्के; मुलींचे प्रमाण 97.42 तर मुलांचे 95.42

बुलडाणा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या ऑनलाइन परीक्षेनंतर यंदाची दहावीची परीक्षा ऑफलाइन घेण्यात आली होती. त्यामुळे पालकांची निकालाबाबत उत्सुकता वाढली होती. ही उत्सुकता आज १७ जुन रोजी दुपारी १ वाजता निकाल लागल्यानंतर कुठे आनंदाच्या तर कुठे नाराजीच्या स्वरुपात दिसून आली. जिल्ह्याचा निकाल ९६.३९ टक्के इतका लागला असून मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.४२ टक्के आहे तर मुलांचे प्रमाण ९५.४२ टक्के आहे. प्रावीण्य श्रेणीत १९७९९ तर प्रथम श्रेणीत ११९७५ , द्वितीय श्रेणीत ४२०३ व उत्तीर्ण श्रेणीत ८३४ विद्यार्थी आहेत.

या शैक्षणिक वर्षात २१ हजार ७२३ मुले व १७ हजार ५०६ मुली असे एकुण ३९३३९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी २१४९३ मुले व १७३२९ मुली अशा ३८ हजार ८२२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये २९ हजार ५४१ मुले व १६ हजार ८८२ मुली असे एकुण ३७ हजार ४२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अमरावती विभागात बुलडाणा जिल्हा हा दुसऱ्या स्थानावर आहे. शून्य टक्के निकाल लागलेल्याही खामगाव तालुक्यातील दोन शाळा आहेत. चितोडा उर्दू हायस्कूल व निवासी मूकबधिर स्कूल खामगावचा समावेश आहे. बहुतांश निकाल हे ७५ टक्क्यांपेक्षा अधिकच आहे. या निकालामुळे अमरावती विभागात जिल्ह्याने चांगलेच यश मिळवले.

जिल्ह्यात सिंदखेडराजा सर्वात टॉप सिंदखेड राजा ९८.३८ टक्के, मलकापूर ९८.५७, देऊळगावराजा ९८.२२, मेहकर ९७.९४, चिखली ९७.६१, बुलडाणा ९७.१९, शेगाव ९७.०९, मोताळा ९६.६६, लोणार ९६.५१, खामगाव ९६.४५, संग्रामपूर ९६.३४, जळगांव (जा.) ९५.६३, नांदुरा ९५.३० टक्के निकाल लागला आहे.

शिवसाई युनिव्हर्सल स्कूलचा निकाल शंभर टक्के
शिवसाई युनिव्हर्सल स्कूलचे परीक्षेसाठी एकूण ४५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते ३३ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले. सदर पैकी शाळा स्तरावर ५ विद्यार्थी नव्वदी पार झाले आहेत. त्यामध्ये आदित्य पाटील ९३.८० टक्के मिळवून शाळा स्तरावर प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.

विवेक यदमाळ ९२.६० टक्के श्रुती चापके ९१.८० प्रणव पवार ९१.२० उदय राजपुत ९१.००, निकिता खरे ८९.६०, आदित्य राठोड ८९.६०, मानसी पळसकर ८८, बुद्धभूषण झिने ८७.८०यश पाटील ८७.६० तनु बंगाळे ८६.८०, वैष्णवी भाकरे ८६.६०, दीपिका सुरूशे ८६.२०, प्रज्ज्वल भाग्यवंत ८६.२०, ओम काकडे ८५.४०, प्रेम पाटील ८५.०० टक्के गुण उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यार्थ्यांच्या यशात ज्ञानेश्वर मोहरकर, कल्पना देवकर, सविता वानखेडे, भागवत उबरहंडे, दीपाली शिंपणे यांचे मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डी. एस लहाने यांनी कौतुक केले.

भारत विद्यालय, बुलडाणा निकाल ९८.८४ टक्के
भारत विद्यालय, बुलडाणा या शाळेचा एकूण निकाल ९८.८४ टक्के इतका लागला आहे. परीक्षेस बसलेल्या एकूण ३४६ विद्यार्थ्यांपैकी १३० विद्यार्थ्यांनी प्रावीण्य श्रेणी संपादन केली आहे, तसेच १२७ विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले असून ९० विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत आणि पाच विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणीमध्ये स्थान मिळवले आहे.

शाळेमधून सर्वाधिक ९९ टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा मान कुमारी रिद्धी नरेंद्र चाटोरीकर हिने मिळवला असून, तेजल कैलास चांदा हिने ९७.२० टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर श्रुती गजानन टेकाळे हिने ९६.६० टक्के गुण प्राप्त करून तिसरे स्थान प्राप्त केले.तसेच ऋतुजा विजय आडवे ९६.२० टक्के, आसावरी संजय वानखेडे :९६.२० टक्के, तन्वी सतीश जाधव : ९६.०० टक्के,मानसी संतोषकुमार कांबळे ९५.८० टक्के, युवराजसिंग विक्रमसिंह मरमट: ९५.८० टक्के, आभा भगवान कुलकर्णी ९५.४० टक्के, मानसी संतोष खर्चे ९५.४० टक्के यांनी पण उल्लेखनीय यश मिळवले आहे. एकूण २८ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे १० विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयामध्ये १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत या यशाबद्दल भारत विद्यालय सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. सीमा हर्षवर्धन आगाशे, अंगद हर्षवर्धन आगाशे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. मुख्याध्यापक पी. डी. गायकवाड, उपमुख्याध्यापक एम. एन. घोंगटे व एन.डी. गवई यांनी शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे कौतुक केले आहे.

बातम्या आणखी आहेत...