आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:शेतकऱ्यांना वीजपुरवठा करताना हयगय करू नका : डॉ. राजेंद्र शिंगणे

सिंदखेडराजा3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रब्बीचा हंगाम सुरू झालाय. शेतकरी आधीच अतिवृष्टीने खचला आहे. त्यामुळे रब्बीच्या हंगामातून शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना वीजपुरवठा करतांना हयगय होता कामा नये अशा सूचना माजी मंत्री आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बुधवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. देऊळगावराजा, सिंदखेडराजा तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी आधीच संकटात आहे. असे असले तरी यंदा जलसाठे तुडूंब असल्याने रब्बीच्या हंगामातून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना नियमित वीज मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत. सक्तीची वीज बिल वसुली करू नका. शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडू नका आणि शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करतांना हयगय करू नका अशा सूचना यावेळी आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या. बैठकीला महावितरणचे अधीक्षक अभियंता डॉ.बद्रीनाथ जायभाये उपस्थिती होते.

बातम्या आणखी आहेत...