आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:देऊळघाट येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे स्थलांतर करू नका : मल्हार सेनेची मागणी

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथून जवळच असलेल्या देऊळघाट येथील बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा स्थलांतरीत करण्यात येवू नये. या आशयाचे निवेदन ६ मे रोजी बँक ऑफ महाराष्ट्र चे प्रबंधक तसेच विभागीय कार्यालय अकोला यांच्या देण्यात आले आहे.

देऊळघाट येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेमध्ये दहा हजारच्या वर खातेदारांची संख्या असून सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत. परंतु मागील काही दिवसापासून देऊळघाट येथील शाखा बुलडाणा येथे स्थलांतरीत होत असल्याची चर्चा आहे. देऊळघाट येथील बँक ऑफ महाराष्ट्र ची शाखा इतरत्र स्थलांतरीत झाल्यास श्रावणबाळ, संजय गांधी निराधार तसेच वयोवृद्ध नागरिकांना व्यवहार करण्याकरता त्रास सहन करावा लागेल.

तसेच बँक ऑफ महाराष्ट्र देऊळघाट शाखेच्या शाखा व्यवस्थापकांकडून खातेदारांना उद्धटपणे वागणूक मिळत असते. या वागणुकीमुळेच शाखेचे आर्थिक व्यवहार कमी होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. देऊळघाट वासियांसह शाखेतील १० हजार ग्राहकांचा विचार करुन शाखेचे स्थलांतरण करु नये, अशा मागणीचे निवेदन मल्हार नवयुवक सेनेचे प्रदेश अध्यक्ष नंदू जगन्नाथ लवंगे व देऊळघाट ग्रामस्थांनी दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...