आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:मंजूर झालेली कामे करा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार

बुलडाणा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जॉन ले आऊट मधील मंजूर झालेली विकास कामे करण्यात यावी, अन्यथा होवू घातलेल्या नगर पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा या ले आऊट मधील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांना दिला आहे.

शहरातील जॉन ले आऊट हे मागील १९६७ मध्ये मंजूर झालेले ले आऊट आहे. सध्या स्थितीत या ले आऊट मध्ये बहुतांश खासगी दवाखाने आहेत. मागील काही वर्षापुर्वी पालीकेने या ले आऊट मध्ये सर्व्हिस लाइन, पक्क्या नाल्या व रस्त्याची कामे मंजूर केली होती. परंतु आजपर्यंत एकही मंजूर झालेले काम केले नाही. नाल्या नसल्यामुळे गटारे साचली आहे. या गटारामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी या ले आऊट मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकी पूर्वी मंजूर झालेली विकास कामे करावी, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा जी.बी. काकडे, वच्छलाबाई जाधव, जयसिंग जयवार, राजेश जाधव, लक्ष्मण सावजी, डॉ. अजित सिरसाट, डॉ. संजय पाटील, योगेश चंदन, प्रफुल्ल भोरे, सुभाष पाटील, रविकांत जाधव, नीलेश जाधव, हमीदखॉ, आनंद जाधव व अमित नारनवरे यांच्यासह नागरिकांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...