आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निराकरण:सेवानिवृत्तांच्या मेळाव्यात शंकाचे निरसन‎

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाच्या सेवेतून‎ निवृत्त झालेल्या निवृत्ती वेतनधारक,‎ कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच् या‎ मेळाव्यात सेवानिवृत्तांच्या विविध‎ शंकाचे निरसन करण्यात आले. जिल्हा‎ कोषागार कार्यालयाच्या प्रशिक्षण‎ सभागृहात निवृत्तीवेतनधारक, कुटुंब‎ निवृत्तीवेतन धारकांच्या मेळावा ३‎ ऑक्टोबर रोजी पार पडला. या‎ मेळाव्याला जिल्हा कोषागार अधिकारी‎ ऋषिकेश वाघमारे, एसबीआयचे भरत‎ शेळके, अमितकुमार आदी उपस्थित‎ होते.

मेळाव्यात अपर कोषागार‎ अधिकारी पंडित मांडोगडे, देविदास‎ पाबळे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा‎ निवृत्ती वेतनधारक संघटनेचे जिल्हा‎ अध्यक्ष डॉ. पऱ्हाड यांनी निवृत्ती‎ वेतनधारकांच्या समस्या व अडचणी‎ सांगितल्या. या वेळी वाघमारे यांनी‎ निवृत्ती वेतनधारकांच्या समस्यांचे‎ निरसन केले.

निवृत्ती वेतनधारकांकडून‎ प्राप्त तोंडी, लेखी निवेदने स्वीकारून‎ त्यांचे निराकरण करण्यात आले. या‎ मेळाव्याचे प्रास्ताविक उपकोषागार‎ अधिकारी प्रकाश पाटील यांनी केले.‎ सूत्रसंचालन गजानन हेलोडे यांनी केले,‎ तर आभार चौधरी यांनी मानले.‎

बातम्या आणखी आहेत...