आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दौरा:डॉ.नीलम गोऱ्हे यांचे आज बुलडाण्याच्या दौऱ्यावर

बुलडाणा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. नीलम गोऱ्हे हे २५ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथून सकाळी ८ वाजता खासगी वाहनाने बुलडाणा येणार आहे.दुपारी १२.१५ वाजता शासकीय विश्रामगृह बुलडाणा येथे आगमन व राखीव. दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्यासोबत बैठक, जिल्ह्यातील महिला अत्याचाराचा घटना व उपयोजना, कौटुंबिक हिंसाचार आढावा, मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत मदत वाटप आढावा.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या मदतीचा आढावा घेणार, कोविड काळात मृत्यू झालेल्या कुटुंबियांना कर्ज वसुलीबाबत बँकेकडून होणारा तगादा जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा येथे बैठक. दुपारी २ वाजता पोलिस अधीक्षक बुलडाणा यांच्यासोबत बैठक, दुपारी ३ वाजता शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी यांच्यासोबत भेटी घेणार आहे. सायंकाळी ४.३० वाजता चिखली येथे सभास्थानी पाहणी. सायंकाळी ७ वाजता शासकीय विश्रामगृह बुलडाणा येथे आगमन व राखीव.

बातम्या आणखी आहेत...