आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:डाॅ. शिवाजी म्हस्केंच्या कथा‎ भारत सरकारच्या पोर्टलवर‎

हिवरा आश्रम‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. शिवाजी मस्के यांनी लिहिलेल्या‎ २०० स्वातंत्र्य सैनिकांच्या कथा भारत‎ सरकारच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात‎ येणार आहे. या कार्याबद्दल संस्कृती‎ मंत्रालयातर्फे नागपूर येथे त्यांचा‎ सत्कार करण्यात आला.‎ भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत‎ महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या‎ संस्कृती मंत्रालयाच्या वतीने‎ डीडीआर प्रोजेक्ट राबवला जात‎ जिल्ह्यातील डॉ. शिवाजी म्हस्के‎ यांची केंद्र सरकारकडून निवड‎ करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी‎ पाच महिन्यांमध्ये २०० स्वातंत्र्य‎ सैनिकांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन‎ माहिती संकलित करून त्यांच्या कथा‎ लिहिल्या.

त्या सरकारकडे सादर‎ केल्या.‎ भारतातून सर्वाधिक कथा सादर‎ करण्यात डॉ. म्हस्के यांनी यश‎ मिळविले. या कार्याबद्दल संस्कृती‎ मंत्रालयाच्या वतीने सीसीआरटीचे‎ अध्यक्ष डॉ. विनोद इंदुरकर व‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सीसीआरटीचे संचालक ऋषी‎ वशिष्ठ यांच्या हस्ते नागपूर येथील‎ राजाराम वाचनालयात आयोजित‎ कार्यक्रमात डॉ. म्हस्के यांचा सत्कार‎ करण्यात आला. याप्रसंगी‎ सीसीआरटीचे उपसंचालक दिबाकर‎ दास यांची उपस्थिती होती. याप्रसंगी‎ डॉ. विनोद इंदुरकर यांनी डीडीआर‎ प्रोजेक्टबाबत प्रेक्षकांना माहिती दिली.‎ अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचा‎ गौरव शिवाजी म्हस्के यांनी आपल्या‎ कथांच्या माध्यमातून केला असून,‎ सीटीआरटीचे मुख्य ॲम्बेसिडर‎ म्हणून त्यांची निवड झाली अाहे,‎ असे त्यांनी घोषित केले.‎

बातम्या आणखी आहेत...