आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदया मंदीरचे यशस्वी विदयार्थी:डॉ. होमी भाभा परीक्षेत सहकार विद्या‎ मंदिरच्या विद्यार्थ्यांचे सुयश‎

बुलडाणा‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई सायन्स टिचर्स असोसिएशन‎ च्या वतीने घेण्यात आलेल्या‎ डॉ.होमीभाभा बाल वैज्ञानिक‎ परीक्षेत सहकार विद्या मंदिर,‎ बुलडाणा येथील विद्यार्थ्यांनी यश‎ प्राप्त केले आहे.‎ सदर परीक्षा तीन टप्यात होत‎ असून याचा प्रथम टप्पा २६‎ नोव्हेंबर २०२२रोजी झाला. या‎ परीक्षेमध्ये वर्ग सहावीचे विद्यार्थी‎ शौर्य जैन, स्वरुप हिंगे, आदित्य‎ ठेंग, पीयूष मेहेर, हर्षीता मिसाळ,‎ आस्था अग्रवाल.

तसेच वर्ग‎ नववीचे हर्षित ठेंग, वेदांत ठोसरे,‎ रिद्धी वसु , अंशुला खर्चे या‎ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले असुन‎ त्यांची द्वितीय टप्प्यासाठी निवड‎ झाली आहे.‎ द्वितीय टप्प्यातील वर्ग सहावीची‎ परीक्षा २२ जानेवारी व वर्ग‎ नववीची १५ जानेवारी रोजी होणार‎ आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे‎ बुलडाणा अर्बनचे संस्थापक‎ अध्यक्ष भाईजी, बुलडाणा अर्बनचे‎ चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.‎ सुकेश झंवर व संस्थेच्या अध्यक्षा‎ कोमल झंवर यांनी कौतुक करुन‎ पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा‎ दिल्यात. विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय‎ संस्थेच्या अध्यक्षा, प्राचार्य,‎ शिक्षक यांना दिले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...