आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. राधाकृष्णन यांना अभिवादन:डॉ. झाकीर हुसेन उर्दू शाळेत विविध कार्यक्रमांनी शिक्षक दिन साजरा

डोणगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथून जवळच असलेल्या अंजनी बुद्रुक येथील डॉ. झाकीर हुसेन उर्दू शाळेत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. सर्वप्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक मोहम्मद सलाहुद्दीन शेख यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे कार्य केले. तर इयत्ता ५ वी चा विद्यार्थी काशीफ शाहने मुख्याध्यापकाची भुमिका बजावली. बिलाल खान तहसील खान ने पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले. शेख सुफियान मोहम्मद आरीश, शे बिलाल युसुफ, शे. जिशान रफीक, शे. उजेर, शे.उमेर अरमान खान यांनी शिक्षक म्हणून काम केले. यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षिका जोया जावेद शाह, सुफया हरमैन, आयशा शकील शाह, इनाया तस्कीन शे लुकमान, तसनिया तैवाज शेख. मीजा सै इसहाक, आयशा मोहम्मद वसीम यांनी सहकार्य केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आगामी निवडणुकीसाठी पालकांना प्रोत्साहित करण्याची शपथ घेतली. कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

येथील आदर्श प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापक विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी निखिल भुयार यांच्या हस्ते शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश तथा शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी सरस्वती पूजन व डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. विद्यार्थ्यांना डॉ. राधाकृष्णन यांचा जीवन परिचय करून दिला. सूत्रसंचालन कोलते यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षिका व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...