आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Buldhana
  • Drinking Water Issue Of Khamgaon, Nandura Residents Solved; ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​ Abundant Water Storage In The Project, 80 Percent Of The Gyanganga Project| Marathi News

दिलासा:खामगाव, नांदुरावासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला; ​​​​​​​ प्रकल्पात मुबलक जलसाठा, ज्ञानगंगा प्रकल्प ८० टक्के

खामगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव, नांदुरा वासियांची तहान भागवणाऱ्या गेरु माटरगाव येथील ज्ञानगंगा प्रकल्प २१ ऑगस्ट रोजी ८०.५३ टक्के भरला आहे. या प्रकल्प क्षेत्रात यंदाच्या पावसाळ्यात १ जून ते २१ ऑगस्ट २०२२ या कालावधीत एकूण ३५०मि.मी.इतकी पर्जन्यवृष्टी झाली आहे. आजच्या घडीला या प्रकल्पात मुबलक प्रमाणात जलसाठा असल्याने खामगाव व नांदुरा वासियांचे पाण्याचे टेन्शन मिटले आहे. गत वर्षी हा प्रकल्प ८ ऑगस्ट रोजी शंभर टक्के होता. आज जरी हा प्रकल्प शंभर टक्के भरला नसला तरी पावसाळ्याच्या उर्वरीत दिवसात या प्रकल्प क्षेत्रात जोरदार पाऊस झाला तर यंदाही हा प्रकल्प शंभर टक्के भरेल अशी आशा आहे.

पाटबंधारे उपविभाग खामगाव अंतर्गत ज्ञानगंगा व मस हे दोन मध्यम व धानोरा, राजूरा, गोडाडा, लांजुळ व ढोरपगाव हे पाच लघु प्रकल्प येतात. यापैकी खामगाव तालुक्यातील विहिगाव येथील मस मध्यम १६ ऑगस्ट २०२२ पुर्वीच शंभर टक्के भरला होता. या प्रकल्प क्षेत्रात २१ ऑगस्टच्या सकाळी आठ वाजेपर्यंत एकूण ४७५ मि.मि.पाऊस पडला आहे. या प्रकल्पाच्या सांडव्यावरुन ८ से.मी.ने विसर्ग आहे. या प्रकल्पातील उपयुक्त पाण्याचा साठा १५.०४ दलघमी इतका आहे. धानोरा प्रकल्प सुध्दा शंभर टक्के भरला आहे. या प्रकल्पाच्या सांडव्यावरुन २ सेमीने विसर्ग सुरु आहे. राजूरा प्रकल्प देखील शंभर टक्के भरला असून या प्रकल्पाच्या सांडव्यावरुन ३ सेमीने विसर्ग सुरु आहे. यातील उपयुक्त पाण्याचा साठा ३.३९ दलघमी आहे. गोडाडा प्रकल्प देखील शंभर टक्के भरला आहे. यात उपयुक्त पाण्याचा साठा १.७७ दलघमी आहे. या प्रकल्पाच्या सांडव्यावरुन ३ सेमीने विसर्ग सुरु आहे. तर लांजुळ प्रकल्पात केवळ ११.४ टक्के जलसाठा आहे. यात उपयुक्त पाण्याची टक्केवारी ०.१९ दलघमी आहे. ढोरपगाव प्रकल्पातील पाण्याच्या साठ्याची टक्केवारी ६१.४४ आहे यात उपयुक्त पाण्याचा साठा ३.५९ दलघमी इतका आहे.

गतवर्षी शंभर टक्के प्रकल्प भरल्याच्या तारखा व नाव
ज्ञानगंगा २४ सप्टेंबर २०२१, गोडाडा ४ ऑक्टोबर २०२१, राजूरा ५ ऑक्टोबर २०२१, मस १७ ऑक्टोबर २०२१, धानोरा १९ ऑक्टोबर २०२१, ढोरपगाव ८ ऑगस्ट २०२१, बोरजवळा २३ सप्टेंबर २०२१.

प्रकल्प क्षेत्रात २१ ऑगस्टपर्यंत पडलेला एकूण पाऊस
ज्ञानगंगा ३५० मि.मी., मस ४७५ मि.मी., धानोरा ६७५ मि.मि., लांजुळ ५५० मि.मि. उर्वरीत ३ प्रकल्पात पर्जन्यमापक यंत्राची सोय नसल्याने येथे किती पाऊस पडला याची माहिती मिळू शकली नाही.

बातम्या आणखी आहेत...