आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठिबक‎ नळ्या:शेतातील दीड लाखाच्या ठिबक‎ नळ्या चोरट्यांनी केल्या लंपास‎

मोताळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतातील १ लाख ४० हजार रुपये‎ किमतीच्या जैन कंपनीच्या ६५० फूट ठिबक नळ्या‎ अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. ही घटना‎ परडा शिवारात आज २० डिसेंबर रोजी सकाळी‎ सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.‎ प्रकरणी तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांत अज्ञात‎ चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‎ तालुक्यातील बोराखेडी येथील अमानउल्लाह खान‎ यांची परडा शिवारात शेती आहे.

या शेतात त्यांनी‎ सिंचन करण्यासाठी जैन कंपनीच्या ठिबक नळ्या‎ ठेवल्या होत्या. दरम्यान काल १९ डिसेंबर रोजी‎ साडेसात वाजेच्या सुमारास ते शेतातून घरी आले.‎ दुसऱ्या दिवशी २० डिसेंबर रोजी सकाळी सात‎ वाजेच्या सुमारास ते शेतात गेले असता त्यांना १‎ लाख ४० हजार रुपये किमतीच्या ६५० फूट ठिंबक‎ नळ्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात‎ आले. प्रकरणी अमानउल्लाह खान यांनी दिलेल्या‎ तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी अज्ञात‎ चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील‎ तपास नापोका शिवाजी मोरे हे करीत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...