आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर पालिकेचेही दुर्लक्ष:वाढत्या अतिक्रमणामुळे शहरातील चौकात, रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बुलडाणा शहरातील विविध चौकात वाहतुकीची कोंडी होत असताना त्या चौकातील फिक्स पॉइंटवर वाहतूक पोलिसच दिसत नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे वाढत्या अतिक्रमणाकडे नगर पालिका दुर्लक्ष करत असल्याने या वाहतूक कोंडीला नगर पालिकेचाही हातभार लागत असल्याचे चित्र आहे. त्यातच जिल्हा वाहतूक शाखा निर्माण करत असताना, शहर वाहतूक शाखेकडे दुर्लक्ष केल्यानेही वाहतूक पोलिस केवळ अधिकाऱ्यांच्या रहदारीच्या मार्गावरच ठराविक वेळेत दिसून येतात.

गेल्या पाच वर्षात बुलडाणा शहरात मिळेल त्या जागेवर अतिक्रमण केल्या जात आहे. हे अतिक्रमण उठवण्याचे अधिकार नगर पालिकेला असून जिल्हाधिकारी सुध्दा रहदारीला त्रास होत असल्याने अतिक्रमण उठवण्याचे आदेश काढू शकतात. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय, डाक विभागाला लागून असलेले अतिक्रमण जर निघत नसेल तर इतर ठिकाणच्या अतिक्रमणापर्यंत हे अधिकारी बघूही शकत नाही, अशी अवस्था आहे. आता प्रशासकीय बदल झाले असून जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक नव्याने रुजु झाले आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासुन जिल्ह्याचे ठिकाणी असलेल्या ढिसाळ

या गजबजलेल्या रस्त्यांवर होते कोंडी
संगम चौक हा शहरातील मुख्य मार्ग आहे. जो जिल्हाधिकारी कार्यालय, जांभरुण रोड, बस स्थानक, आठवडी बाजार, शिवाजी शाळा आदि भागात जातो. या ठिकाणी वाहतुकीची एवढी कोंडी होते की वाहन चालकांच्या नाकी नऊ येतात. या भागात अस्थायी अतिक्रमण वाढण्यास पालिकेने जणूकाही मुक संमती दिल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसुन येत आहे. हॉस्पिटल मोठया प्रमाणात असल्याने या रस्त्याने ॲम्बुलन्स नेण्यासही त्रास होत असतांना पालिका व पोलिस प्रशासन मात्र गप्प आहे.

शाळांजवळील रस्त्यांवरही सारखीच परिस्थिती
सर्क्युलर रोड, तहसील चौक, एडेड शाळा चौक या भागातून विद्यार्थी एडेड शाळा, भारत शाळा, प्रबोधन शाळा यासह जिजामाता कॉलेज या शाळांमध्ये अध्ययन करण्यासाठी जातात. मात्र सकाळी व संध्याकाळी या परिसरातील चौकांत व रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होतांना पोलिसांना दिसत नाही. त्यातच हा राज्य महामार्ग असल्याने तर अजुनच वाहतुक ठप्प होते.

बातम्या आणखी आहेत...