आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात सात लाख ३५ हजार ५२१ हेक्टर क्षेत्रावर यंदा खरिपाची पेरणी होणे अपेक्षित होते. मात्र १७ जून पर्यंत जिल्ह्यात फक्त ६.०४ टक्के इतकाच पाऊस पडला आहे. त्यामुळे ज्या भागात बऱ्यापैकी पाऊस पडला व सिंचनाची व्यवस्था होती अशा फक्त २९ हजार ४५९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. परंतु, सात लाख सहा हजार ६२ हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पाऊस न पडल्यामुळे रखडल्या आहेत. असाच पाऊस रखडला तर बळीराजावर संकट येणार आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, रासायनिक खते खरेदी करुन पेरणीयोग्य जमीन करुन ठेवून आपल्या जवळची पुंजी लावली आहे. आता निसर्गाने साथ द्यावी, अशी बळीराजाची अपेक्षा आहे.
यंदा खरिपाच्या पेरणीत सोयाबीनचा पेरा तीन लाख ९४ हजार ४२५ हेक्टरवर होणार होता. प्रत्यक्षात १४००२ हेक्टरवर पेरा झाला असून ज्याची टक्केवारी ३.१५३ टक्के आहे. कापसाचा पेरा एक लाख ८३ हजार ५५८ हेक्टर क्षेत्रावर होणार होता. प्रत्यक्षात १३ हजार ७०४ हेक्टर पेरण्या झाल्या आहेत. ज्याची टक्केवारी ७.४७ आहे. तालुका निहाय पेरणीच्या टक्केवारी कडे लक्ष वेधले असता जळगाव जामोद तालुक्यात शून्य टक्के, संग्रामपूर तालुक्यात २.६४ टक्के, चिखली तालुक्यात ०.२८ टक्के, बुलडाणा तालुक्यात ०.४ टक्के, देऊळगाव राजा तालुक्यात ९८.४९ टक्के, मेहकर तालुक्यात ८.५२ टक्के, सिंदखेड राजा तालुक्यात ७.३ टक्के, लोणार तालुक्यात ३.९९ टक्के, खामगाव तालुक्यात ०.२४ टक्के, शेगाव तालुक्यात ०.३० टक्के, मलकापूर तालुक्यात ६.५६ टक्के, मोताळा तालुक्यात ८.८१ टक्के, नांदुरा तालुक्यात ६.३४ टक्के पेरणी झाली आहे. तालुकानिहाय आजपर्यंत पडलेला पाऊस : बुलडाणा ३९.३ मिमी, चिखली ८६.३ मिमी, देऊळगाव राजा ७०.८ मिमी, सिंदखेड राजा ८०.१ मिमी, लोणार ७१.८ मिमी, मेहकर ८९.६ मिमी, खामगाव ४९.६ मिमी, शेगाव ३१.८ मिमी, मलकापूर १४.१ मिमी, नांदुरा १५.५ मिमी, मोताळा १३.७ मिमी, संग्रामपूर १४.८ मिमी, जळगाव जामोद २०.७ मिमी पाऊस पडला आहे.
^७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतर सोयाबीनची तीन ते चार सेंटी मीटर खोलीपर्यंत पेरणी करावी. सोयाबीनची उगवण क्षमता ७० टक्केपेक्षा कमी असल्यास अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे. -अनिसा महाबळे, कृषी विकास अधिकारी,बुलडाणा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.