आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांची पाठ:कमी भावामुळे शेतकऱ्यांचा शासकीय खरेदीसाठी नोंदणीस अल्प प्रतिसाद

बुलडाणा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनामार्फत मका, ज्वारी या भरड धान्याची खरेदी राज्य शासन किमान आधारभूत किमतीने करणार आहे. त्यासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर असून २३ जानेवारीपर्यंत धान्य खरेदी करण्यात येणार आहे. यापूर्वी शासनाने ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती व आताही मुदतवाढ दिली आहे. मात्र शेतकऱ्यांनी नोंदणीकडे पाठ फिरवली आहे. मूग व उडदाची तर एकही नोंदणी न झाल्याची परिस्थिती आहे. शेतकरी आधारभूत किंमत कमी मिळत असल्याने शासकीय खरेदी नोंदणीकडे पाठ फिरवत असतील तर शासन शेतकऱ्यांप्रती जागरूक नसल्याचे चित्र दिसत आहे.

गतवर्षीपेक्षा यंदा हमीभावात वाढ होऊनही खासगीत जास्त दर मिळत असतील तर शासकीय यंत्रणेकडे शेतकरी दुर्लक्ष करणारच. मक्याकरता ८८७ तर ज्वारी करता १९० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.जिल्ह्यात मक्याची पेरणी २० हजार ८३५ हेक्टरवर करण्यात आली आहे. ज्वारीची पेरणी १० हजार १९७ हेक्टरवर करण्यात आली आहे.

पण अपेक्षित नोंदणी नाही
हमी भाव ठरवल्यानंतर राज्य शासनामार्फत जिल्ह्यात १५ केंद्रांवर नोंदणी करुन भरड धान्याची खरेदी केली जाणार होती. त्याला मुदतवाढ मिळूनही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली नाही. बाजारात मिळणारा भाव व शासकीय भावात फरक असल्याने कदाचित असे झाले असावे.-पी. एस. शिंगणे, जिल्हा पणन अधिकारी, बुलडाणा

भावात वाढ, पण फक्त २८ क्विंटलची नोंदणी
१ नोव्हेंबरपासून मका व ज्वारी नोंदणीला सुरुवात झाली असून दीड महिना उलटल्यानंतरही नोंदणीला प्रतिसाद मिळून आला नाही. हमी भावाने मक्याला १९६२ रुपये भाव आहे. जो मागील वर्षापेक्षा ९२ रुपयाने अधिक आहे. तर संकरित ज्वारीला २९७० भाव आहे जो गतवर्षीपेक्षा २३२ रुपयाने अधिक आहे आणि मालदांडी ज्वारीला २,९९० रुपये हमी भाव आहे जो मागील वर्षीपेक्षा २३२ रुपयाने अधिक आहे. असे असतानाही शेतकऱ्यांनी शासकीय नोंदणीकडे पाठ फिरवल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. कारण आतापर्यंत फक्त २८ क्विंटलची नोंदणी झाली आहे.

अशी आहे ज्वारीची लागवड
जळगाव जामोद ८२८.८० हेक्टर, संग्रामपूर ९३१.८० हेक्टर, चिखली १६८ हेक्टर, बुलडाणा १७३.४० हेक्टर, देऊळगाव राजा ४१.६० हेक्टर, मेहकर १५३ हेक्टर, सिंदखेड राजा २०.८० हेक्टर, लोणार २५०.८० हेक्टर, खामगाव १७६३ हेक्टर, शेगाव १७८७ हेक्टर, मलकापूर १४३१.४० हेक्टर, मोताळा ८०९ हेक्टर, नांदुरा १८३८ .१० हेक्टर.

बातम्या आणखी आहेत...