आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्प प्रतिसाद:कमी भावामुळे शेतकऱ्यांनी फिरवली आधारभूत किंमत नोंदणीकडे पाठ

बुलडाणा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मका, ज्वारी या भरड धान्याची खरेदी केंद्र शासना मार्फत राज्य शासन किमान आधारभूत किमतीने खरेदी करणार आहे. त्या करता नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आलेले असतानाही गतवर्षीपेक्षा अद्याप दहा टक्केही शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. बाजारात जास्त किंमत मिळत असल्याने मका व ज्वारीची नोंद होत नसल्याची बाब स्पष्ट होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत नोंदणी व जानेवारी २०२३ पर्यंत खरेदी करण्याचा शासनाचे धोरण आहे. मक्याला शासनाने एक हजार ९६२ रुपये क्विंटल इतका भाव दिला असून बाजारात २२०० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांचा खरेदीला प्रतिसाद मिळत नाही.जिल्ह्यात मक्याची पेरणी २० हजार ८३५ हेक्टर वर करण्यात आली असून ज्वारीची पेरणी १० हजार १९७ हेक्टरवर करण्यात आली आहे.

खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी माल आणावा
केंद्र शासनाने हमी भाव ठरवल्यानंतर राज्य शासना मार्फत जिल्ह्यातील १५ केंद्रावर नोंदणी करुन भरड धान्याची खरेदी केली जाणार आहे. तेव्हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आपला माल आणावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, जिल्हा पणन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

अशी आहे ज्वारीची लागवड
जळगाव जामोद ८२८.८० हेक्टर, संग्रामपूर ९३१.८० हेक्टर, चिखली १६८ हेक्टर, बुलडाणा १७३.४० हेक्टर, देऊळगाव राजा ४१.६० हेक्टर, मेहकर १५३ हेक्टर, सिंदखेड राजा २०.८० हेक्टर, लोणार २५०.८० हेक्टर, खामगाव १७६३ हेक्टर, शेगाव १७८७ हेक्टर, मलकापूर १४३१.४० हेक्टर, मोताळा ८०९ हेक्टर, नांदुरा १८३८.१० हेक्टर.

बातम्या आणखी आहेत...