आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकर्यावर संकट:शॉर्ट सर्किटमुळे वीस गुंठ्यातील ऊस खाक; शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

सावखेड नागरे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शॉर्ट सर्किटमुळे वीस गुंठ्यातील ऊस जळून खाक झाला असून शंभर पपईच्या झाडाचे देखील नुकसान झाले आहे. या घटनेत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली आहे.

येथील शेतकरी प्रल्हाद हरिभाऊ खोबरे यांचे गाव शिवारात गट नंबर १६९ मध्ये वीस गुंठे शेती आहे. या शेतीत त्यांनी ऊसासह शंभर पपईची झाडे लावली होती. शेतातील ऊस काढणीवर आला होता. या ऊसाच्या शेतातून वीज प्रवाहित तारा गेल्या आहेत. दरम्यान शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास हवेमुळे दोन तारामध्ये घर्षण होवून त्याच्या ठिणग्या उसावर पडल्या. शेतात पालापाचोळा असल्याने काही वेळातच आगीने रौद्र रुप धारण केले. यावेळी उसाच्या शेतातून धुराचे लोट बाहेर येत होते. हा ऊस रसवंतीसाठी विक्री करण्याचा त्यांचा मानस होता. परंतु, त्या पूर्वीच ही घटना घडली. या घटनेत त्यांचे दिड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच महसुलचे एम. के. जोरवाल व कोतवाल भगवान ढाले यांनी शेतात धाव घेवून नुकसानीचा पंचनामा केला. यावेळी संजय मोरे, ग्रामपंचायत सदस्य ढोले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...