आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुलडाणा विभागातील सात आगारात २०१९ पासून एकही नवीन बस आली नाही. मात्र ७५ बस कमी झाल्या आहेत. यातील ३४ बस माल वाहतुकीसाठी वापरण्यात येत आहे. १९ बसेस शिवशाही आहेत. याचा परिणाम राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर झाला असून अनेक बस फेऱ्या कमी झाल्या आहेत. तेरा लाख सात हजार ४८३ प्रवाशांनी विविध सवलतींचा लाभ घेतला असून त्याची प्रतिपूर्तीची रक्कम सात कोटी ८६ लाख ५४ हजार ८४४ इतकी झाली आहे.
तीन वर्षांच्या तुलनेत सध्या जवळपास पाच हजार किलोमीटर एस.टी. कमी धावत असल्याची आकडेवारी सांगत आहे. सध्या अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवास सवलत योजना सुरु केल्याने त्याचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढली आहे. मोफत प्रवासाअंतर्गत सहा लाख २४ हजार ७६७ लाभार्थीनी प्रवास केला आहे. त्याची प्रतिपूर्ती रक्कम दोन कोटी ७१ लाख ५९ हजार ९०२ इतकी आहे. सर्वच सवलती लक्षात घेतल्या तर एस.टी.ची चाके या सवलतीच्या ओझ्याखाली दबल्या सारखी वाटतात.
कारण ही सवलतीची रक्कम प्रतिपूर्तीच्या रुपात शासनाकडून तत्काळ मिळणे कठीणच आहे. जिल्ह्यातील सातही आगार मिळून ४२१ बस आहेत. त्यातील ७५ बस कमी करण्यात आल्या आहेत. यामध्ये ३४ माल वाहतुकीसाठी उपयोगात आणला जात आहे. तर ४० बस भंगारात काढण्यात आल्या आहेत. शिक्षणासाठी सवलतीची प्रतिपूर्ती ९९ लाख अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत इयत्ता ९ वी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींचा मोफत प्रवास आहे. २० हजार ३८९ इतक्या विद्यार्थिनींनी या शिक्षणासाठी या प्रवास सवलतींचा लाभ घेतला.
तीन लोक प्रतिनिधींचे मोफत प्रवास
पत्रकार छायाचित्रकार फक्त १५९ पत्रकारांनी प्रवास केला त्याची १४ हजार ३३० प्रतिपूर्ती रक्कम, ३२ स्वातंत्र्य सैनिकांचे प्रवास, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त ७१, आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त ८, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त ६७, शिवछत्रपती, दादोजी कोंडदेव, द्रोणाचार्य, अर्जुन पुरस्कार प्राप्त ७०, अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त १४, महात्मा गांधी व्यसनमुक्त पुरस्कार प्राप्त ४२, दुर्धर आजार ३५६, सिकलसेल १२२, हिमोफेलिया ३३, असे मोफत लाभार्थींची प्रतिपूर्ती रक्कम तीन लाख २५ हजार ३५१ इतकी आहे. यामध्ये प्रवास योजनेचा लाभ फक्त तीनच लोक प्रतिनिधींनी घेतला असून त्याची प्रतिपूर्ती रक्कम फक्त १३७ रुपये इतकी आहे.
ज्येष्ठ नागरिकांवर एक कोटी
विविध प्रकारच्या सवलती शासनाने लागू केल्या असून ज्येष्ठ नागरिक हा त्यातील एक घटक आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासाचा अहवाल बघितला असता पाच लाख ४७४ ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला आहे. त्याची प्रतिपूर्तीची रक्कम एक कोटी १४ लाख ८१ हजार २६२ इतकी आहे. त्या खालोखाल एक लाख आठ हजार १५३ अंध व्यक्तींनी केलेल्या प्रवासाची ४२ लाख ९३ हजार ४८० एवढी प्रतिपूर्तीची रक्कम आहे. तर अंध व्यक्तीसोबत राहणाऱ्या ४४६ साथीदाराची प्रतिपूर्ती रक्कम ७४३०६ इतकी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.