आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रम संस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो, असे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सदस्य ओमप्रकाश देशमुख यांनी केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने मोताळा तालुक्यातील खरबडी येथे आयोजित विशेष श्रम संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. २३ मार्च रोजी या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. आठ दिवस चालणाऱ्या या शिबिराची सुरवात खरबडी येथे श्रमदान करून करण्यात आले. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळवण्यासाठी विविध बौद्धिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष श्रम संस्कार शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य ओमप्रकाश देशमुख हे होते.
तर प्रमुख वक्ते म्हणून पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य जयश्री खाकरे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील, प्राचार्य डॉ. सुनील मामलकर, प्रा.विजय धुमाळ, सरपंच शालिनी वाकोडे, उपसरपंच प्रफुल्ल किंनगे, मोताळा प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश पाटील, पत्रकार लखन पाटील, ग्रामसेवक छाया बशिरे, पोलिस पाटील अनिल भांमद्रे, मुख्याध्यापिका सरिता अंभोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीकृष्ण इंगळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरवात रासेयो विद्यार्थीनी निकिता तायडे व दिव्या खराटे यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर ओमप्रकाश देशमुख यानी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
तसेच पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, माजी सभापती संजय पाटील, प्राचार्य सुनील मामलकर यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत असताना प्रा. पुरुषोत्तम चाटे यांनी आठ दिवस चालणाऱ्या या विशेष श्रम संस्कार शिबिरा बाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. चित्रा मोरे यांनी तर आभार डॉ. अरुण गवारे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, स्वयंसेविका ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.