आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन दिवसांपूर्वी तापमानाचा पारा घसरल्याने दिवसाही थंडी वाजण्यास सुरुवात झाली होती. मात्र सकाळी घरात उकाडा जाणवत असल्याने पंखे लावण्याची वेळ लोकांवर येत आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांत ढगाळ वातावरण असून, हवेत गारवा आहे. मात्र हवेचा वेग कमी असल्याने हा गारवा कमी असला तरी शेकोट्या पेटवण्याची वेळी लोकांवर आली.
सोमवारी सकाळी बुलडाण्याचे तापमान २० अंश सेल्सिअस एवढे होते. दुपारी २३ ते २५ अंशांपर्यंत पोहोचले होते. सायंकाळी यामध्ये बदल झाला होता. दोन दिवसांपूर्वी हेच तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम आहे. हवेचा वेग ताशी ११ ते १८ किमी असा होता. सायंकाळी ७ ते ८ किमी. ताशी हवेचा वेग होता. मंगळवारीही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. वातावरणातील या बदलामुळे सर्दी, पडसे असे व्हायरल आजाराची कुणकुण जाणवू लागली आहे.
यंदा डिसेंबर महिना लागला तरी तापमानात गारठा जाणवला नव्हता. परंतु आता तो जाणवत आहे. उबदार कपडे बाहेर काढूनही त्याचे काम आतापर्यंत पडले नव्हते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून उबदार कपडे घातल्याशिवाय बाहेर पडता येत नव्हते. वाहनावर मात्र या थंडीने हुडहुडी भरू लागली आहे. पायी चालताना मात्र ती जाणवत नसल्याचे दिसत आहे. परंतु, या नरम, गरम वातावरणाने दवाखान्यातील गर्दी वाढू शकते. खासगी व सरकारी रुग्णालयातही तापाचे रुग्ण वाढल्याने सरकारी रुग्णालयात औषधांचा साठा करण्याची आवश्यकता पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज, उद्या पाऊस पडण्याची शक्यता
जिल्ह्यात हवेचा दाब निर्माण होऊन दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली होती. यामध्ये रविवारी काही भागात पावसाचा शिडकावा झाला होता. मात्र सोमवारी व मंगळवारी हमखास पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली. दरम्यान काही भागात शिडकावा पडला. बुधवारीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाऊस पडल्यास गारठ्यात वाढ होणार आहे. परिणामी व्हायरल इन्फेक्शन वाढण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.