आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सुकता:न्यायालयाच्या निकालानंतर नगर पालिका निवडणुकीची उत्सुकता; जिल्हा प्रशासनाकडे अजून माहिती नाही

बुलडाणा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसी आरक्षणामुळे नगर पालिका निवडणुका रखडल्या होत्या. निवडणुक विभागाऐवजी राज्य शासनानेच ही निवडणुकीसाठी पुन्हा प्रभाग रचना करण्याचे सुचना दिल्या होत्या. ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुक होणार नव्हती. अशी शक्यता असल्याने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आज ४ मे रोजी निवडणुका घेण्याचा उच्च न्यायालयाचा निकाल लागताच जिल्ह्यातील ९ नगर पालिका क्षेत्रातील इच्छुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. मात्र या बाबत नगर पालिका प्रशासनाकडे निवडणुकीबाबत शासानाकडून कोणतीच माहिती मिळाली नव्हती. मात्र हरकती व दावे दाखल असल्यास त्याचा निकाल लावण्याची तयारीला मात्र जिल्हा प्रशासनाला लागावे लागणार आहे.

जिल्ह्यातील नऊ नगर पालिकांच्या निवडणुकीसाठी १० मार्च रोजी प्रभाग रचनेवर हरकती व सुचना मागवण्यात आल्या होत्या.त्यामुळे निवडणुका लागण्याच्या शक्यता असतानाच ११ एप्रिल रोजी पुन्हा नव्याने फेररचना करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे नगर पालिकेत फेर रचनेच्या कामाला नगर पालिका प्रशासन लागले होते. दरम्यान, उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेचा निकाल आज लागला. उच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश देताच राजकीय स्तरावर उत्सुकता शिेगेला पोहचली. परंतु, अजूनतरी नगर पालिका प्रशासनाकडे निवडणुकांबाबत माहिती आली नाही.

ती लवकर येण्याची शक्यता आहे. प्रभाग रचनेबाबत पुर्वी घेतलेल्या हरकती व दावे आता निकाली काढण्याच्या सुचना सुध्दा येऊ शकतात. त्यानंतरच निवडणुकांची तारीख निश्चित होणार आहे. येत्या काही दिवसांत नगर पालिकांचे ढोल वाजणार असल्याने प्रभाग किती वाढले व कोठे वाढले. हे निश्चित कळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...