आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराहेरी येथील महामार्गावरील मुख्य पुल वाहतुकीसाठी गेली अनेक महिने बंद आहे. सदर पुलाचे काम, वळण रस्त्याच्या कामावर अवलंबून असल्याने, वळण रस्ता नागपूर डाक लाईन वगळून ई क्लास जमिनीतून तात्पुरता रस्ता तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. त्यामुळे वळण रस्ता सुरू होण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे.
जालना-पुलगाव हा नॅशनल हायवेकडे २०१८ मधे वर्ग करण्यात आला. मात्र, त्या आधीच राज्य सरकारने राहेरी येथील नागपूर डाक लाइन रस्ता, पूर्णा नदीवरील नवीन पुलासाठी निधी मंजूर केला होता. कोरोना काळात कोणतीच विकास कामे झाली नाही, त्यात या कामाचा देखील समावेश होता. कोरोनाकाळा नंतर हा नॅशनल हायवे कडून या कामासाठी १० कोटी रुपये मंजूर झाले. परंतु या दोन्ही कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाने दावा केला. त्यानुसार नॅशनल हायवे ने मंजूर रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केली.
निविदा प्रक्रिया पूर्ण झाली परंतु अर्धे अधिक काम झाल्यानंतर नदीत पाणी असल्याने पुन्हा या कामात खंड पडला. वळण रस्त्याच्या पुलाचे काम आता पूर्ण झाले असले तरीही राहेरी गावातून जाणाऱ्या जुन्या नागपूर डाक लाइनवर अनेक अतिक्रमणे झाल्याने आणि त्यातच राजकीय हस्तक्षेप वाढल्याने पुन्हा हे काम मंदावणार आहे. दुसरीकडून रस्ता सुरू व्हावा यासाठी प्रशासनावर दबाव होता. त्यामुळे नेमका मार्ग काय काढावा असा प्रश्न प्रशासनासमोर होता.अखेरीस या संदर्भात उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी पुढाकार घेवून ई क्लास जमिनीतून वळण रस्ता करण्या संदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश घेतले. दोन दिवसांपूर्वी निघालेल्या या आदेशामुळे आता वळण रस्त्याचे काम मार्गी लागेल असे वाटत असताना पुन्हा ग्रामस्थांनी ई क्लास जमिनीतून वळण रस्ता नेण्यास विरोध दर्शवला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना कामाला होणार विरोध प्रशासनाने मोडून काढण्याची गरज आहे.या संदर्भात शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना सोबत घेवून स्थळपाहणी केली. स्थळ पाहणीत रस्ता जाणीव पूर्वक अडवला जात असल्याचे लक्षात येते. स्थळ पाहणी नंतर तहसील येभबैठकीत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब बांधकाम विभागाचे सहायक अभियंता बी. एन. काबरे, कनिष्ठ अभियंता महेश भाले यांनी आणून दिली. गरज पडल्यास पोलिसांची मदत घेऊ असे अहिरे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.