आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वेक्षण:खा. मुकुल वासनिकांनी संसदेत उपस्थित केला खामगाव-जालना रेल्वे मार्गाचा प्रश्न

बुलडाणा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खा. मुकुल वासनिक यांनी शुक्रवारी संसदेत खामगाव-जालना रेल्वे मार्गाचा प्रश्न उपस्थित करुन पाच दशकांपासून त्याला विलंब का होत आहे, असा प्रश्न केला आहे. या मार्गाचे सर्वेक्षण खरंच करण्यात आले का, अशी शंकाही उपस्थित केली.मराठवाडा व विदर्भाला जोडणारा जालना ते खामगाव हा नवीन मार्ग गेल्या पाच दशकांपासून सरकारच्या विचारार्थ आहे. त्यामुळे सरकार या योजनेला त्वरीत पूर्ण करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर केव्हा सुरु करणार जर करत नसेल तर त्याचे कारण काय, असा प्रश्न मुकुल वासनिक यांनी उपस्थित केला. या प्रश्नाला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिले की, १५५ किमी लांब असलेल्या या मार्गाचे २०११-१२ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. सर्वेक्षण अहवालानुसार जालना खामगाव या नवीन मार्गावर १०२७ कोटी रुपये लागणार होते. परंतु, ही योजना लाभकारी नसल्याने चाल योजना व निधी वेळेत उपलब्ध होऊ न शकल्याने या मार्गाचे काम पुढे जाऊ शकले नाही.

२०१६-१७ मध्ये पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत या मार्गावर तीन हजार करोड रुपये प्रत्यक्ष खर्चात सामील करण्यात आले. यात राज्य व केंद्र सरकार संयुक्तरितीने ही योजना सुरु करणार होती. त्यानुसार महाराष्ट्राची एक कंपनी व रेल्वे मंत्रालयात चर्चा आहे. अद्याप याबाबत योजना पुढे आली नाही. विस्तृत अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे. २०२१ मध्ये जालना खामगाव रेल्वे अंतिम सर्वेक्षण करण्यात आले आहे. विस्तृत अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या प्रस्तावावर विचार करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...