आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक सहल‎:शेंदुरजनाघाट नगर परिषद उच्च प्राथमिक‎ शाळेची वाकी येथे शैक्षणिक सहल‎

शेंदुरजनाघाट11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक शहरातील नगर परिषद‎ उच्च प्राथमिक शाळा क्र. ४ ची शैक्षणिक सहल‎ नागपूर जिल्ह्यातील वाकी येथील एका वॉटर‎ पार्कमध्ये नुकतीच आयोजित केली होती.‎ विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी‎ तसेच त्यांच्या विविध कौशल्य विकासासाठी या‎ शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते. शैक्षणिक‎ सहलीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी विशेष‎ सहकार्य केले.

तसेच परिवहन महामंडळ व नगर‎ परिषद प्रशासनाच्या सहकार्याने शाळेची सहल‎ सुरक्षित पार पडली. सहलीच्या यशस्वितेसाठी‎ मुख्याध्यापिका रंजना पाटील, सविता कांडलकर,‎ भावना मेंढे, ज्योत्स्ना चव्हाण, माधव तिडके,‎ नंदकिशोर नागपुरे, पंकज चाफले, श्वेता‎ सावरकर, माया आखरे, शाळेतील शिक्षकेतर‎ कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...