आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी:आयशर ट्रक- दुचाकीच्या अपघातात तीन जखमी ; पॉवर हाऊस जवळील वळणावर दोन्ही वाहनाची धडक

अंढेरा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव जाणाऱ्या आयशर ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दुचाकीवरील तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना आज १५ जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पॉवर हाऊस जवळील वळणावर घडली. देऊळगावरावरून रेशनचे धान्य घेवुन एम.एच.०४/ ए जी/ ९२७३ या क्रमांकाचा आयशर ट्रक अंढेऱ्याकडे येत होता. तर देऊळगाव घुबे येथील विजय तरमळे वय ३२, प्रकाश पैठणे वय ३० व शाम पुरभे वय ३० हे तिघे एम.एच. २८/ ए.एम/ १०१९ या क्रमांकाच्या दुचाकीने मच्छी घेवुन देऊळगाव घुबे कडे जात होते. येथून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या पॉवर हाऊस जवळील वळणावर येताच दोन्ही वाहनाची धडक झाली.

बातम्या आणखी आहेत...