आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय गणित चुकणार:जिल्ह्यात वाढले आठ गट व सोळा गण; जिल्हा परिषद निवडणुकीसाठीच्या प्रभाग रचना जाहीर

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भाने जिल्ह्यात आज प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्या आहेत. या प्रभाग रचनांमुळे जिल्ह्यात आठ गटांची व सोळा गणांची वाढ झाली असून या वाढीमुळे गट व गणांची पूर्वीची स्थिती व आजच्या स्थितीत बदल झाला आहे. हा बदल राजकीय आराखड्यांचे गणित चुकवणारा आहे. कारण निवडणुकीची तयारी करणाऱ्यांसाठी ही रचना कितपत योग्य ठरते हे आगामी काळच सांगेल. पण आता निवडणुकीचे पडघम लवकर वाजणार असल्याने नेत्यांना नव्याने राजकीय सुरुवात करावी लागणार आहे.

जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, नांदुरा, मलकापूर, मोताळा, खामगाव या सहा तालुक्यांत प्रत्येकी एक तर मेहकर तालुक्यात दोन जिल्हा परिषदेचे गट वाढले आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने आज जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रभाग रचना जाहीर केली आहे. या प्रभाग रचनेनुसार आता हरकती व सूचना मागवण्यात येणार आहे. त्यानंतर आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. तोपर्यंत जर ओबीसी आरक्षण मिळाले तर आरक्षणासह नाही तर आरक्षणाशिवाय निवडणुका जाहीर होणार आहेत. आजच्या प्रभाग रचनेत गावांचा फेरबदल करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वीच्या मतदारसंघातील गावे तुटल्याने व दुसरीकडे जोडल्याने राजकीय नेत्यांची तारांबळ उडाली आहे.

नांदुरा तालुक्यात एका जि. प. व २ पं. स. गटांची वाढ, नव्या नेतृत्वाचा उदय; दिग्गजांना धक्का राजकीय दृष्ट्या संवेदनशील व बहुचर्चित राजकारणासाठी प्रसिद्ध नांदुरा तालुक्यात एका नवीन जिल्हा परिषद मतदार संघांची तर दोन पंचायत समिती मतदार संघांची भर पडली आहे. अनेक गावांची वेगवेगळ्या मतदार संघात अदलाबदल झाल्यामुळे प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहे. ग्रामीण भागातील उदयोन्मुख नेतृत्वाच्या स्वप्नांना आशेचा किरण दिसत आहे. मतदार संघाचे राजकारण बदलले आहे. आता आमदार बदलले आहेत. त्यामुळे नवीन आमदार हे तालुक्यातील जनताही जी.प.गट, प.स.गट, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्रीचे संदर्भही बदलण्याची शक्यता आहे. नांदुरा तालुक्यातील गट व गण गट टाकरखेड व गण तरवाडी व टाकरखेड गट वडनेर भोलजी व गण वाडी, वडनेर भोलजी गट चांदुरबिस्वा व गण टाकळी वतपाळ चांदुर बिस्वा गट निमगाव व गण नारखेड, निमगाव

बातम्या आणखी आहेत...