आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्याय:वृद्ध कलावंतांनी काढली समाज कल्याणची प्रतिकात्मक प्रेतयात्रा‎

बुलडाणा‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृद्ध कलावंताना न्याय देण्यात यावा‎ तसेच समाजकल्याण विभागाचे‎ भ्रष्ट कर्मचारी स्वप्नील धामोडे व‎ त्याला पाठीशी घालणाऱ्या‎ समाजकल्याण अधिकाऱ्याची‎ प्रतिकात्मक प्रेत यात्रा युवा‎ स्वाभिमान पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष‎ ईश्वरसिंग चंदेल यांच्या नेतृत्वात‎ आज १० मार्च रोजी काढण्यात‎ आली. यावेळी शहर पोलिसांनी ही‎ प्रेत यात्रा अडवून आंदोलनकर्त्यांना‎ ताब्यात घेेतले.‎ वृद्ध कलावंत मानधन समितीला‎ डावलून समाजकल्याण विभागाचे‎ अधिकारी व कर्मचारी स्वप्नील‎ धामोडे यांनी त्यांच्या मर्जीतील‎ कलावंताना पात्र दाखवले.‎ कोणत्याही कलावंताचे प्रस्ताव‎ निवड समितीला दाखवले नाही.‎ त्यामुळे या निवड यादीत भ्रष्टाचार‎ झाल्याचा आरोप चंदेल यांनी केला‎ आहे. मागील तीन वर्षांत तीनशे‎ कलावंताची निवड करणे निश्चित‎ असताना फक्त २६३ कलावंतांनाच‎ पात्र ठरवण्यात आले. त्यामुळे ३७‎ कलावंतावर अन्याय झाला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...