आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात वृद्ध:ट्रॅव्हल्सच्या धडकेत पायी जाणारा वृद्ध ठार

शेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दर्शनासाठी पायी जाणाऱ्या एका वृद्धास ट्रॅव्हल्सने जबर धडक दिली. या अपघातात वृद्ध जागीच ठार झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शहरातील चित्रकला चौकात घडली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाळापूर तालुक्यातील धनेगाव येथील मूळ रहिवासी असलेले व सध्या वारकरी नगरात राहात असलेले हरीचंद्र पांडुरंग लांडे (८५) हे गुरुवारी सकाळी दर्शनासाठी मंदिरात जात होते. एवढ्यात पाठीमागून भरधाव येणाऱ्या एन एल ०१ /बी / १८६० या क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने त्यांना जबर धडक दिली.

या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. अपघात घडताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघातात गंभीर जखमी झालेल्या हरीचंद्र लांडे यांना दवाखान्यात उपचारार्थ नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शेषराव हिंगणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालक बद्रीनाथ तुकाराम परिहार रा. अंचारवाडी ता. चिखली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुभाष वाघोदे व नापोका उमेश बोरसे हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...