आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष मेळावा:ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही ; विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केला निर्धार

बुलडाणा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ देणार नाही. काहीही झाले तरी ‘ओबीसीं’ना राजकीय आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार असा निर्धार व्यक्त करत, आगामी काळात बुलडाणा जिल्हा हा ‘ओबीसीं’चे बलस्थान होईल असा ठाम विश्वास इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमीन विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात लवकरच ओबीसी विद्यार्थ्यांसाठी दोन वसतिगृहे निर्माण करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. येथील गर्दे सभागृहात तालुका व ओबीसी आरक्षणाशिवाय... शहर काँग्रेस व ओबीसी सेलच्या वतीने आयोजित ओबीसी संघर्ष मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे मावळते जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस माजी आ. हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड, बारा बलुतेदार संघटनेचे प्रमुख तथा प्रदेश महा सरचिटणीस कल्याण दळे, प्रदेश काँग्रेस सचिव स्वाती वाकेकर, काँग्रेस नेते ॲड विजय सावळे, श्याम उमाळकर, मुख्यत्यारसिंग राजपूत, रामविजय बुरुंगले, धनंजय देशमुख, उषा चाटे, समाधान सुपेकर, एकनाथ चव्हाण, दत्ता काकस, रवी पाटील, भागवत वानेरे, ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन खरात, समाधान दामधर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मेळाव्याचे निमंत्रक दिपक देशमाने यांनी ओबीसींच्या चळवळीवर प्रकाश टाकुन महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर व्हावा, ओबीसी समाजाची जात गणना व्हावी, आठ ठराव मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमच्या हिश्शाचे कुणाला घेऊ देणार नाही बारा बलुतेदारांना ओबीसी महामंडळाकडून दोन कोटी रुपये निधी देऊन स्वतंत्र महामंडळ करणार असल्याचे यावेळी वडेट्टीवार म्हणाले. आम्ही कोणाच्या हिश्श्याचे मागणार नाही, आमच्या हिश्श्याचे कोणाच्या बापाला घेऊ देणार नाही असेही ते म्हणाले. महाज्योतीमध्ये मुस्लीम ओबीसींना ५ टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

‘समान नागरी’चा डाव ही टर्म संपण्यापूर्वी ‘समान नागरी कायदा’ करण्याचा डाव आहे. असे झाल्यास कुठे जातील आदिवासी? कुठे जातील ओबीसी? कारण त्यांची मातृसंस्था नागपुरची कधीच आरक्षण देणार नाही. आरक्षणाच्या नावाने रडणाऱ्यांचे आश्रू मगरीचे आहेत, असा आरोप करत वडेट्टीवार यांनी आरक्षण फक्त काँग्रेसच देऊ शकते, दुसऱ्यांकडून अपेक्षा कराल तर फसाल, असेही म्हणाले.

‘त्या’ २२ गावांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न शैक्षणिक विकासासोबतच जिल्ह्यातील तांडावस्तीसाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. जिगाव प्रकल्पामध्ये जिल्ह्याचे भाग्य बदलवण्याची क्षमता आहे. या प्रकल्पासाठी २२ गावांचे पुनर्वसन होण्यासाठी प्रयत्न करून जिल्ह्यातील सिंचन क्षमता प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...