आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:वडाळी येथून ऐंशी हजार रुपयांच्या वीज तारांची चोरी

नांदुरा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वडाळी शेतशिवारातून वीज वितरण कंपनीचे ८० हजार रुपये किमतीच्या ॲल्युमिनियम वीज तारांची चोरी झाल्याची घटना साेमवारी घडली. याबाबत गुरुवारी नांदुरा पोलिसात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वीज कंपनीचे अभियंता श्रीकृष्ण समाधान राजस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ३ ऑक्टोबर रोजी सकाळी वडाळी शिवारात जियासेठ शेख जमीर व भारत त्र्यंबक वक्टे यांच्या शेतातील महावितरण कंपनीचे डीपीवरील लघु दाब वाहिनीचे ८० हजार रुपये किंमतीचे ॲल्युमिनियम तार अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...