आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्तीरस:अकरा कावड मंडळांनी काढली कावड यात्रा ; ओम नमः शिवायचा जयघोषा

शेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी शिवभक्त युवकांकडून कावळयात्रेचे शेगावात आयोजन केले होते. यामध्ये अकरा कावड मंडळांनी यात्रेमध्ये सहभाग नोंदविला होता. भोले शंकर ओम नमः शिवाय चा जयघोषाने व पावसाच्या सरीने संत नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली होती.

श्रावण महिन्यात सोमवारी कावड यात्रेचे आयोजन करण्यात येते. ज्यामध्ये भगवान शंकराचा जलाभिषेक करण्यात येतो. त्यानुषंगाने शहरातील ११ कावड मंडळांनी पायी प्रवास करून शहरापासून १५ कि.मी. अंतरावरील खिरोडा येथून पुर्णा नदीचे जल आणून भगवान शिवाला अर्पण केले. कावड यात्रेतील भगवान शिवशंकराच्या विविध स्वरूपातील विशालकाय मूर्ती लक्ष वेधून घेत होत्या. ज्यामुळे यात्रेत सहभागी शिवभक्तांमध्ये उत्साह संचारल्याचे दिसून येत होते. या निघालेल्या कावड यात्रेत मानाची कावड, दयावान ग्रुप कावड, जयकाल भैरव कावड, सियाराम सेवा ग्रुप, हिंदुराज्य दल कावड, मातंगेश्वर ग्रुप कावड शिवमल्हार ग्रुप कावड, महाकालेश्वर कावड, तांडव ग्रुप, मांगकाल कावड व पूरातन महादेव मंदिर अशा ११ कावड मंडळांचा समावेश होता. कावडयात्रेदरम्यान शहरात कोठेही काही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी पोलिस प्रशासनाकडून घेण्यात आली होती. त्याकरिता चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...