आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांचा सन्मान:बहाळ येथील महिलांना रोजगाराचे‎ मार्गदर्शन, श्रीराम मंदिरात कार्यक्रम‎

बहाळ‎ कसबे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्रीराम मंदिरात‎ बुधवारी सकाळी महिलांना‎ रोजगाराचे मार्गदर्शन करण्यात‎ आले. तसेच महिला दिनानिमित्त‎ महिलांचा सन्मान करण्यात आला.‎ पंचायत समितीच्या माजी‎ सभापती स्मितल बोरसे यांनी मुद्रा‎ लोन, पोखरा योजना, नाबार्ड‎ योजनेचा लाभ कसा घ्यावा याबाबत‎ महिलांशी संवाद साधला. महिलांना‎ आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्रातील‎ प्रधानमंत्री शासकीय योजनेच्या‎ सुक्ष्मअन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत‎ उद्योगातून महिलांना आत्मनिर्भर‎ करण्यासाठी मार्गदर्शन, जिल्हा‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मानव संसाधन व्यक्ती प्रवीण‎ पाटील यांनी विचार मांडले.

उद्योग‎ उभा करण्यासाठी कागदपत्रांची‎ पूर्तता कशी करावी व शासकीय‎ उद्योग व्यवसायाबाबत मार्गदर्शन‎ केले. एक जिल्हा एक उत्पादन या‎ आधारावर ही प्रक्रिया राबविली‎ जाणार आहे. वैयक्तिक लाभार्थी -‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वैयक्तिक लाभार्थी, भागीदारी‎ संस्था, बेरोजगार युवक, महिला,‎ प्रगतशील शेतकरी, मर्यादित‎ भागीदारी संस्था भागीदारी व्यवसाय‎ उभारता येतो, असे त्यांनी सांगितले.‎ सूत्रसंचालन वैशाली भोई यांनी‎ केले. यावेळी रत्नाबाई महाजन,‎ सरूबाई महाजन उपस्थित होत्या.‎

बातम्या आणखी आहेत...