आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रकांत खरात यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी‎:खासगी रुग्णालयांमध्ये‎ रुग्ण हक्कांची सनद लावा‎

देऊळगावराजा‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण‎ हक्कांची सनद दर्शनी भागात लावण्यात यावी, अशी‎ मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय‎ सदस्य चंद्रकांत ज्ञानदेव खरात यांनी केली आहे.‎ या संदर्भात खरात यांनी आरोग्यमंत्री,‎ जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हा शल्य‎ चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना‎ निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की,‎ खासगी रुग्णालयांनी रुग्ण हक्कांची सनद व दर‎ पत्रकाची माहिती दर्शनी भागात लावणे कायद्याने‎ बंधनकारक आहे.

परंतु, बहुतांश रुग्णालयांमध्ये सनद‎ दर्शनी भागात लावलेली नाही. अनेक खासगी प्रॅक्टीस‎ करणाऱ्या डॉक्टरांनी व रूग्णालयांनी या नियमाला‎ हरताळ फासला आहे.‎ लोकांच्या आरोग्याशी थेट संबंध असणाऱ्या‎ डॉक्टरांनी नियम धाब्यावर बसवणे चिंताजनक असून‎ त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जून २०१९ मध्ये‎ सर्व राज्यांमधील खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये‎ रुग्ण हक्कांची सनद दर्शनी भागात लावण्याचे आदेश‎ जारी केले होते.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने‎ सप्टेंबर २०२० आणि मे २०२१ मध्ये याविषयी आदेश‎ निर्गमित केले. तसेच राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व‎ जिल्ह्यांना आदेश दिले होते.‎ जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत खासगी रुग्णालयांत‎ १५ दिवसांच्या आत रुग्ण हक्कांची सनद दर्शनी‎ भागात लावण्यात यावी. तसेच आदेशाचे पालन न‎ करणाऱ्या रुग्णालयांचा परवाना रद्द करण्यात यावा,‎ अशी मागणी चंद्रकांत खरात यांनी या निवेदनाद्वारे‎ केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...