आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धीरज वैष्णव:123 वर्षांची परंपरा जपण्याचे अविरत प्रयत्न ; लोकमान्य टिळकांच्या आवाहनावरुन स्थापन

मलकापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मलकापूर शहरात जुने गाव परिसरात दुर्गानगरातील मल्लिकार्जुन महादेव मंदिरात १२३ वर्षांपासून पार्वतीसूत भक्त गणेश मंडळ कार्यरत आहे. लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक उत्सव सुरू करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा गणेशोत्सव अविरतपणे सुरू आहे. लो. टिळकांनी आवाहन केल्यानंतर १८९९ साली पार्वतीसूत भक्त गणेश मंडळाची स्थापना केली. त्यावेळी स्वातंत्र्य सेनानी केशव नारायण सावजी, प्रसिद्ध साहित्यिक पु. भा. भावे, विष्णू सावजी, श्रीधर डोरले, राजाभाऊ घिर्णीकर, अॅड.कायले, ॲड. पिंप्रीकर, कथने गुरुजी आदिसह तरुण मंडळींनी पुढाकार घेत गणेशोत्सवाला सुरुवात केली. १२ ते १५ वेशी असणाऱ्या शहराला किल्ल्याच्या भिंतीच्या कोटात बांधणी होती. ऐतिहासिक मल्लिका अर्जुन महादेवाच्या मंदिर परिसरात गणेश उत्सव साजरा होत असे. तसे शहरात २ ते ३ आणखी मंडळे होती. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी नागरिकांना झालेला आनंद गगनांनामध्येही न मावणारा होता. त्या अानंदात मंदिरासमोर सभामंडप बांधण्याच मानस लोकांनी दर्शवला. गोविदसा सावजी यांनी सभामंडप बांधण्यासाठी जागा संस्थेला दिली. स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असतांना या सभामंडपालाही ७५ वर्ष पूर्ण झाले आहेत, अशी माहिती शिरीष दादा घिरणीकर यांनी दिली.

गणेश मंडळाची विद्यमान कार्यकारिणी
या गणेश मंडळाच्या सध्याच्या कार्यकारणीत प्रसाद आमले, मनीष अनवेकर, गौरव खरे, अमोल निंबोळे, सुशील कथने, गौरव माहुरकर, महेश खरे,आशिष माहुरकार, पंकज कोल्हे,चेतन कोल्हे, दीपक खाडे, शुभम वाघ, सौरभ पाटील, सूरज कुलकर्णी , मयूर वाघ, ऋषिकेश माहुरकर, श्रीपाद जोशी, कृष्णा नारखेडे आदींचा सहभाग आहे. ही कार्यकारिणी परंपरा जपत आहे.

भक्त नवस बोलतात
दर्शनास येणारे भक्त बाप्पाला नवस बोलतात. नवसात चांदीचा हात, ५१ किलोचा मोदक, १०८ नारळाचे तोरण, १००८ मोदक, ५६ भोगाचा नैवेद्य असे अनेक पद्धतीने नवस फेडतात. हाच वारसा जपत ह्या पिढीतील सदस्यांनी सुद्धा मलकापूर नगरीच्या संकटाचा नाश होण्यासाठी गणेश याग, सहस्त्रावर्तन, सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठण, १०८ सत्यनारायण पूजा ,सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक देखावे असे उपक्रम राबवले.

बातम्या आणखी आहेत...