आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील २९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडले. मतदान प्रक्रिये दरम्यान किरकोळ ताणतणाव वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. तालुक्यातील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केली होती. जवळपास सर्वच गावांत महिला व युवकांनी मतदानात उत्साह दाखवला. वृद्धांनीही नातेवाईकांच्या मदतीने मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यातील मतदानाची टक्केवारी मोठी असून, प्रत्येक गटाच्या मतदान प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी एक-एक मतदान करून घेण्यावर शेवटपर्यंत भर दिला. जांभोरा, रुम्हणा, चांगेफळ, झोटिंगा, तढेगाव, राताळी, शिंदी आदी गावे राजकीय चर्चेत अग्रस्थानी होती. चांगेफळ येथे पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांमध्ये उत्साह दिसून आला.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुनील सावंत, झोनल अधिकारी अस्मा मुजावर, डॉ. प्रवीण कुमार वराडे, अनिकेत इंगोले यांच्यासह पोलिस निरीक्षक केशव वाघ, मधुसूदन घुगे, युवराज रबडे, जितेंद्र आडोळे या पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवला होता. दुपारपर्यंत मतदानात महिला आघाडीवर
३.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी
महिला १६ हजार ४४९
पुरुष १६ हजार ३४७
एकूण ३२ हजार ७९६
टक्केवारी ७१.३३%
मतदारांना केंद्रात आणण्याची राजकीय धुरा युवकांच्या हाती
जवळपास सर्वच मतदान केंद्रावर युवकांनी घेतलेला पुढाकार लक्षणीय होता. आपापल्या उमेदवाराच्या मतदानासाठी केवळ नियोजनच नाही तर मतदारांना केंद्रापर्यंत आणून, त्यांच्याकडून मतदान करून घेण्याची भूमिका उत्साहात पार पाडली जात होती. त्यामुळे राजकारणाची धुरा युवकांनी हाती घेतल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
बाेरखेडी गंडे येथे मतदानाच्या पूर्व रात्रीला तणाव
तालुक्यातील चांगेफळ येथील गट ग्रामपंचायतीचा भाग असलेल्या बोरखेडी गंडे येथे शनिवारी रात्री दोन गटांत वाद झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. स्थानिक पोलिस पाटील यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. या दरम्यान पोलिसांनी गावात जाऊन संतप्त जमावाला शांत केले. दोन्ही गटाच्या ज्येष्ठांनी पुढाकार घेतल्याने तणाव निवळला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.