आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:बुलडाणा तालुक्यातील 48 मतदान केंद्रावर मतदारांचे उत्साही मतदान

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने आज या ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यासाठी एकूण ४८ मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. बुलडाणा शहराचाच एक भाग असलेल्या सावळा सुंदरखेड गट ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याने शहरातही निवडणूक ज्वर चांगलाच चढलेला दिसून आला. सकाळी ७.३० ते ९.३० दरम्यान सुरुवातीलाच ११.११ टक्के मतदान पार पडले. यामध्ये ११९७ स्त्री, ११७७ पुरुष अशा एकुण २९७४ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

तालुक्यात ४८ मतदान केंद्र निर्धारित करण्यात आले होते. तहसीलदार रुपेश खंडारे व निवडणूक कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया पार पाडली. सकाळी ७.३० ते ९.३० दरम्यान ११.११ टक्के, तर दुसऱ्या फेरीत ७.३० ते ११.३० दरम्यान २५.३० टक्के मतदान झाले. यामध्ये ३२०२ स्त्री, ३५७२ पुरुष अशा एकूण ६७७४ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक विभागाकडून जारी केलेल्या माहितीनुसार ७.३० ते १.३० दरम्यान तालुक्यातील मतदान केंद्रावर ५४५५ स्त्री, ५५७० पुरुष अशा एकुण ११०२५ मतदारांनी मतदान केले. टक्केवारी ४१.१७ अशी आहे.

तहसीलमध्ये स्ट्राँग रुम; कार्यालयाला छावणीचे रून
मतपेट्या जमा करुन त्या सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्राँग रुमची व्यवस्था केली जाते. बुलडाणा तहसील मध्ये स्ट्राँग रुमची व्यवस्था करण्यात आल्याने तहसील कार्यालयाला आज पोलिस छावणीचे रुप आले होते. मंगळवारी मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत मतदार व उमेदवार दोघांनाही प्रतिक्षा करावी लागणार आहे. निवडणूका प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी तहसीलदार खंडारे व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...