आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षपूजन:माटरगावात पर्यावरण जनजागृती दिंडी‎ ; होळीच्या दिवशी‎ अभिनव उपक्रमांचे आयोजन

खामगाव‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरण टिकून रहावे या उद्देशाने‎ आचार्य वेरुळकर गुरुजी यांचे‎ प्रेरणेने माटरगाव येथे श्रीगुरुदेव सेवा‎ मंडळ यांचे वतीने गेल्या अनेक‎ वर्षांपासून होळीच्या दिवशी‎ अभिनव उपक्रमांचे आयोजन‎ केल्या जाते. यावेळी देखील‎ सोमवार, दि. ६ मार्च रोजी होळी‎ निमित्त पर्यावरण जनजागृती दिंडी व‎ वृक्षपूजन कार्यक्रम जि.प.हायस्कूल‎ माटरगाव येथे आयोजित करण्यात‎ आला होता.‎ अध्यक्षस्थानी अनंत आळशी,‎ श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष‎ मनीष देशमुख यांनी होळी‎ पेटविण्याकरीता वृक्ष‎ जाळण्याऐवजी त्याचे संवर्धन करावे‎ हा संदेश देत वृक्षपूजन केले.‎

त्यानंतर ह.भ.प.राम महाराज‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ देशमुख यांनी होळीचे पौराणिक‎ महत्व सांगितले. याप्रसंगी माजी जि.‎ प. सदस्य अनंतराव आळशी,‎ सरपंच श्रीकांत तायडे,‎ मुख्याध्यापक पवार, ज्ञानेश्वर‎ लोळ, गजानन निखाडे, मनोहर‎ सारोळकर, प्रकाशराव देशमुख,‎ रामकृष्ण मार्के, सुरेशराव देशमुख‎ दिलीप जाधव, लक्ष्मण‎ फुटवाईक,गोपाल सारोळकर तसेच‎ शाळेतील शिक्षक वृंद भोपळे,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पोहरे, गव्हांदे यांची उपस्थिती होती.‎ यावेळी विद्यार्थ्यांनी जनजागृती दिंडी‎ काढण्यात आली. कार्यक्रमाचे‎ संचालन मंडळाचे उपाध्यक्ष संजय‎ मुरे यांनी केले. कार्यक्रमाचे‎ यशस्वितेकरिता कराळे, अक्षय‎ चव्हाण, गोविंद देशमुख, राहुल‎ दुगाणे, समर्थ देशमुख, मनीष‎ मुरे,अनिकेत मुरे, राष्ट्रधर्म युवामंच‎ व श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या‎ सदस्यांनी परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...