आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जागतिक आरोग्य दिनापर्यंत कोरोना संसर्गजन्य रोगाची जिल्ह्यामधून उच्चाटन; बुलडाणा जिल्ह्यात 8 दिवसांपासून रुग्ण नाही

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक स्तरावर कोरोना नावाच्या संसर्गजन्य आजाराने नागरिक त्रस्त झाले असताना बुलडाणा जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून एकही कोरोना रुग्ण आढळून येत नसल्याने जिल्ह्यातून या रोगाचे उच्चाटन झाल्याचे दिसून येत आहे. बर्ड फल्यु, चिकुन गुनिया हे आजारही मंदावले आहेत. मात्र उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता मात्र आरोग्य विभागाकडून व्यक्त होत आहे. मात्र आरोग्य विभागानेही अजून ऊष्माघाताचा कक्ष उघडला नसल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण ९९००२ इतके आढळले तर यातील ९८३११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ६८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता हा आजार जिल्ह्यात दिसून येत नाही. ३ मार्च रोजी शेवटचे तीन रुग्ण कोविड रुग्णालयात उपचार घेत होते. त्यानंतर एकही रुग्ण आढळला नाही त्यामुळे उपचारार्थ भरती होण्याची शक्यताच नव्हती. दरम्यान, इतर काही जिल्ह्यात बर्ड फ्लू झाल्याचे वृत्त पसरले होते. मात्र जिल्ह्यात असा कोणताही आजार आढळून आला नाही.

पशू असो वा पक्षी असो यांच्यावर कोणताही आजार पसरला नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा मात्र वाढला आहे. ४१ अंशापर्यंत तापमानात वाढ झाली असून खामगाव सारखे शहर ४५ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. सध्या उन्हामुळे पोट दुखणे, ताप येणे, अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदी लक्षणे ही उन्हाचा झटका बसण्याची आहेत. गुरांना, प्राण्यांना सुध्दा या उन्हाचा फटका बसण्याची शक्यता आहे.त्यामुळे या आरोग्य दिनी आरोग्य सांभाळण्यासाठी नागरिकांना जसे दक्ष राहणे आवश्यक आहे. तसे आरोग्य प्रशासनालाही उष्माघात कक्ष उघडणे गरजेचे आहे. मात्र याबाबत आरोग्य विभाग सजग असल्याचे दिसत नाही.

आता महिला रुग्णालय सुरु होईल का?
कोविडचा एकही रुग्ण जिल्ह्यात सध्या आढळून येत नाही व भरती सुद्धा नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून बांधून तयार असलेले एकमेव महिला जिल्हा रुग्णालय आता तरी सुरु होईल का असा प्रश्न चर्चेचा ठरत आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे सर्व उपलब्धता असेल तर हे रुग्णालय जागतिक आरोग्य दिनी सुरु करुन महिला व बालकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम आरोग्य यंत्रणेने करणे गरजेचे होते.

बातम्या आणखी आहेत...