आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजलजीवन मिशन योजनेअंतर्गत सरपंच, सचिव यांच्या तालुकास्तरीय सभेचे आयोजन गुरुवार, १० नोव्हेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्यामार्गदर्शनाखाली करण्यात आले. सदर सभांना ‘युनिसेफ’चे राज्य सल्लागार मंदार साठे हे प्रमुख मार्गदर्शन केले. यानिमित्त ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठीसर्वांनी सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले. देऊळगाव राजा व सिंदखेड राजा येथे या मिशन अंतर्गत सरपंच, सचिवांची सभा घेण्यात आली.
जल जीवन मिशन अंतर्गत सन २०२४ पर्यंत राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास घरगुती कार्यात्मक नळजोडणी द्वारे विहित गुणवत्तेचे पाणी प्रतिमाणसी प्रतिदिन किमान ५५ लिटर या प्रमाणात उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामीण व्यक्तीस स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुद्ध वपुरेसा आणि शाश्वत पाणीपुरवठा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीत सोयीच्या ठिकाणी उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे. यात फक्त योजना पूर्ण करणे एवढाच उद्देश सून कार्यक्षम पाणीपुरवठ्याची एक शाश्वत सेवा उपलब्ध करणे हा यामधील प्रमुख गाभा आहे. सन २०१९ ते २०२४ दरम्यान राबवण्यात येत असलेले जल जीवनमिशन अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवले जावे. यासाठी या अभियानाची व्यापक प्रचार प्रसिद्धी व्हावी, लोकांना योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी संपूर्ण माहिती मिळावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.