आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक महिला दिन:कोळगाव येथे मोफत माेतीबिंदू‎ शिबिरात 320 रुग्णांची तपासणी‎

पाचोरा‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक महिला दिनाचे औचित्य‎ साधून उद्धव बाळासाहेब ठाकरे‎ गटाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंग‎ सूर्यवंशी यांनी कोळगाव येथे जिल्हा‎ परिषदेच्या शाळेत माेफत मोतीबिंदू‎ शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले‎ होते. दीपप्रज्वलनाने शिबिराचे‎ उद्घाटन करण्यात आले. या‎ शिबिरात ३२० नेत्र रुग्णांची तपासणी‎ करण्यात अाली.‎ पाचोरा व भडगाव तालुक्यातील‎ अनेक ठिकाणी सूर्यवंशी यांनी‎ मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया‎ शिबिराचे आयोजन करून‎ वयोवृद्धांना नवी दृष्टी प्रदान‎ करण्याचा संकल्प सामाजिक‎ बांधिलकीतून केला आहे.

रविवारी‎ कोळगाव परिसरातील ज्या लोकांची‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट‎ आहे, अशा गरजू लोकांसाठी‎ मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया‎ शिबिराचे आयोजन करून सुमारे‎ ३२० रुग्णांची तपासणी जळगाव‎ येथील नेत्रचिकित्सक डॉ.जॅकी‎ शेख, डॉ.विष्णू पाटील व त्यांचे‎ सहकारी डॉ.विनोद पाटील यांनी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ केली. त्यातील ६६ रुग्णांना मोतीबिंदू‎ शस्त्रक्रियेसाठी जळगाव येथील‎ कांताई नेत्र चिकित्सालयात‎ पाठवण्यात आले. रुग्णांची‎ तपासणी, जळगाव येथे‎ येण्या-जाण्याचा व मोतीबिंदू‎ शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च वैशाली‎ सूर्यवंशी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...