आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरोजगार:परीक्षा तात्काळ घेण्यात याव्या; बेरोजगार धडकले बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर

बुलडाणा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या १३,५१४ पदांची जाहिरात निघाली होती. सुमारे १८ लाख विद्यार्थ्यांनी या पदांसाठी अर्ज केले होते. परंतु अद्यापही या परीक्षा घेण्यात आल्या नाहीत. या परीक्षा तात्काळ घेण्यात याव्या. अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले बेरोजगारांच्या वतीने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली. या मागणीचे निवेदन राज्य सरकारकडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठविण्यात आले.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर १६ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर गेले होते जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा करत निवेदन दिले. राज्य सरकारने खासगी कंपन्यांना भरती प्रक्रियेचे अधिकार दिलेले आहेत. सदर कंपन्या आपले एजंट नेमून भरती करणारे उमेदवार निवडूण त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात, असे घोळ झालेले आहे.

त्यामुळे खासगी कंपन्यांना भरती प्रक्रियेचा कंत्राट देऊ नये, अशी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे. या मागणीबाबत आपण चर्चा केली असून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची मागणी मान्य न झाल्यास स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घेवून रस्त्यावर उतरू, असा इशारा यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...