आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदर्शन:राष्ट्रसेविका समितीच्या वतीने क्रांतिकारकांचे छायाचित्र प्रदर्शन

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रसेविका समितीच्या वतीने श्री समर्थ मंदिर परिसरात १३ ते २८ मे दरम्यान सुरू असलेल्या प्रवेशवर्गा मध्ये जिल्ह्यातील अनामिक क्रांतीकांराचे फोटो व माहिती प्रदर्शन भरवण्यात आले.

जिल्ह्यात स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या व स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या अनेक क्रांतीकारकांचे फोटो व माहिती अकोला जिल्ह्यातील राष्ट्रसेविका समितीच्या सेविकांनी संकलित केली आहे. क्रांतिकारकांची पेन्सिलच्या माध्यमातून चित्रे रंगवण्यात आली आहे. अतिशय सुंदर असलेल्या या क्रांतिकारकांची ओळख यानिमित्ताने होत आहे. आतापर्यंत शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी या याप्रदर्शनीला भेट दिली आहे. शहरातील नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रसेविका समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

बुलडाणा येथे सुरू असलेल्या पंधरा दिवशीय प्रवेश वर्गाच्या निमित्ताने राष्ट्रसेविका समितीच्या वतीने २६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता शहरातून पथसंचलन काढण्यात येणार आहे. समिती वर्ग सुरू असलेल्या श्रीसमर्थ मंदिर चैतन्यवाडी येथून पथसंचलन प्रारंभ होणार आहे. धन्वंतरी हॉस्पिटल समोरून एलआयसी कार्यालयाजवळून तहसिल चौक, भोंडे सरकार चौक, कारंजा चौक, जनता चौक, भगवान महावीर मार्गावरून जयस्तंभ चौक, संगम चौक, शिवालय समोरून डीएसडी मॉल या मार्ग पथसंचलन जाणार असून समर्थ मंदिर येथे समारोप होणार आहे. राष्ट्रभक्त नागरिकांनी या पथसंचलनाचे चौकाचौकात पुष्पवृष्टी स्वागत करावे असे आवाहन राष्ट्रसेविका समिती नगर शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...