आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखामगाव येथील एमआयडीसीचा विस्तार करताना जिगाव प्रकल्पाच्या विविध कारणांसाठी राखीव जमिनीचे ३२ गट तसेच त्या परिसरालगतच अकृषक भूखंडामध्ये रुपांतरीत झालेले १५ गट हे खोडा ठरत आहे. ते गट वगळून इतर गटातील १८५.४५ हेक्टर जमीन संपादनासाठी पुढील प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. याबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार गुरुवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत निर्णय झाला. जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली खामगाव औद्योगिक महामंडळ क्षेत्र विस्तारीकरणासाठी मागील काही वर्षापासून प्रक्रिया सुरू झाली आहे.
त्यासाठी २५४.४६ चा प्रस्ताव तयार झाला असून २०१६ मध्ये त्यासाठी प्रकरण तयार झाले. त्यानंतर भूसंपादनासाठी खामगाव येथील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रकरण देण्यात आले. भूसंपादनासाठी लागणारा निधी तसेच इतरही बाबीसाठी प्रकरण आतापर्यंत प्रलंबित आहे. जिगाव प्रकल्पासाठी जमिनीवरील आरक्षण काढण्याबाबत मंत्री महोदयांनी आदेश दिले असुन जमिनीवरील आरक्षण हटवण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून पूर्ण झाल्यानंतर लवकरच संबंधित शेतकऱ्याकडून सरळ खरेदीने भूसंपादन केली जाणार आहे. ती प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.