आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोषण:अल्पवयीन मुलीचे शोषण ; आरोपी युवकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

मोताळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील एका गावातील बारा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत एका २८ वर्षीय युवकाने प्रेमाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापीत केल्याची घटना मागील आठ महिन्यांपूर्वी घडली आहे. त्यानंतर त्या युवकाने मुलीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे ती अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी तक्रारीवरून धामणगाव बढे पोलिसांत आज ३ जून रोजी युवका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील बारा वर्ष आठ महिन्याच्या अल्पवयीन मुलीला त्याच गावातील राम प्रल्हाद राठोड वय २८ या युवकाने प्रेमाचे आमिष दाखवून मागील आठ महिन्यांपूर्वी त्या युवकाने त्या अल्पवयीन मुली सोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामध्ये ती मुलगी गर्भवती राहिली आहे.या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून राम प्रल्हाद राठोड या युवकाविरुद्ध धामणगाव बढे पोलिसांत बाल लैंगिक संरक्षण यासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...