आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ:धान्य खरेदी योजनेत नोंदणीसाठी मुदतवाढ

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मका, ज्वारी, बाजरी खरेदी करण्यात येत आहे. या योजनेत शेतकऱ्यांना नाव नोंदणीसाठी दि. ७ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांकडून हमी दराने मका, ज्वारी व बाजरी नोंदणीसाठी दि. ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु यासाठी आता ७ डिसेंबर २०२२ मुदतवाढ देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना हमी दराचा लाभ मिळावा, तसेच शेतकऱ्यांची कमी झालेल्या नोंदणीमुळे शेतकऱ्यांची नोंदणीत वाढ होण्याच्या दृष्टीने मुदतवाढ देण्यात आली आहे. याशिवाय शेतमाल खरेदीसाठी दि. ३१ जानेवारी २०२३ पर्यंत कालावधी देण्यात आला आहे.

केंद्र शासनाने बुलडाणा जिल्ह्यासाठी ५० हजार क्विंटल मका आणि २७ हजार ७५९ क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट दिले आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी हमी दराचा लाभ घेण्यासाठी त्यांनी एसएमएस आल्यानंतर केंद्रावर खरेदीसाठी माल अाणावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...