आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबागलाण तालुक्यातील बिलोंड्या आणि सातपायऱ्या डोंगराला आग लागल्याने १५ हेक्टर क्षेत्र आगीने जळून खाक झाले. यात मोठ्या प्रमाणात वन्यजीव आणि वृक्षांची हानी झाली. रात्रीच्या सुमारास अग्नीच्या ज्वाला सटाणा शहरासह तालुक्यात सर्वदूर दिसत होत्या. यामुळे परिसरात भिती व घबराटीचे वातावरण पसरले. तालुक्यातील मुळाणे, कौतिकपाडे, तरसाळी या परिसरातील बिलोंड्या व सातपायऱ्या डोंगराला मंगळवारी (४ एप्रिल) सायंकाळच्या सुमारास आग लागली. आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण डोंगराला कवेत घेतले. यात वृक्ष, गवत, पालापाचोळ्यासह पक्षी व सरपटणाऱ्या प्राण्यांची मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. आगीची माहिती समजताच वन क्षेत्रपाल पी. बी. खैरनार, वन विभागाचे चार फायर ब्रोलर असले कर्मचारी, मजूर, सटाणा नगर परिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाच्या फायर प्लोअर अग्निशमन बंब व परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. रात्री उशिरापर्यंत बिलोंड्या व सातपायऱ्या डोंगराला लागलेली आग धुमसत होती. आगीच्या ज्वाळा दूरपर्यंत दिसत होत्या. आगीमुळे कौतिकपाडे, तरसाळी, मुळाणे गावात घबराट पसरली हाेती. या ठिकाणी बिबट्यांचे वास्तव्य असल्याने आगीमुळे बिबटे व बछडे गावांमध्ये शिरतात की काय या भीतीपोटी रहिवासी धास्तावले होते. रात्री उशिरा अनेकांच्या प्रयत्नातून आग आटोक्यात आणण्यात यश लाभले. बुधवारी (५ एप्रिल) सकाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिलोंड्या व सातपायऱ्या डोंगराची पाहणी करत पंचनामा केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.