आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हलगर्जी:जिल्ह्यात उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघात कक्ष कधी उघडणार?

जिल्ह्यात उष्णतेचा पारा ४१ अंशाच्या वर चढत असल्याने उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र आरोग्य विभागानेही अजून उष्माघाताचा कक्ष उघडला नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात असा कक्ष उघडल्याचे कोठेही दिसून आले नाही. मात्र जळीत कक्ष हाच उष्माघात कक्ष असल्याचे सांगितले जात आहे. या जळीत कक्षात मात्र कोणतीही सुविधा अद्याप उपलब्ध करुन देण्यात आली नसल्याचे चित्र आहे. सध्या तरी एकही उष्माघाताचा रुग्ण आढळून आला नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

बुलडाण्यात ४१ अंशांपर्यंत तर खामगाव येथे ४४ ते ४५ पर्यंत हे तापमानात वाढत आहे. उष्णतामान वाढल्यास पोट दुखणे, ताप येणे, अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे दिसून येत आहेत. गुरांना, प्राण्यांना सुध्दा या ऊन्हाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आरोग्य सांभाळण्यासाठी नागरिकांना जसे दक्ष राहणे आवश्यक आहे. आरोग्य प्रशासनालाही उष्माघात कक्ष उघडणे गरजेचे आहे.

मात्र याबाबत आरोग्य विभाग सजग असल्याचे दिसत नाही. उष्माघाताबाबत मात्र जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभाग पुढे सरसावला आहे. मात्र तो फक्त बातम्यांपुरताच आहे. सध्या ऊन लागण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र घरातच उपचार करणारेही अनेकजण आहेत. ग्रामीण भागात शेताला पाणी देताना जमिनीतून निघणाऱ्या पाण्याच्या वाफेने उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवतो. त्यात वरील तापणाऱ्या उन्हामुळे लोकांचा त्रास वाढू लागला आहे. नाकातून पाणी येण्यासारखे प्रकारही घडत आहेत. पाण्यातील बदलही सर्दी व खोकला वाढवत आहे.

उष्माघातावर उपचार करता येणारी रुग्णालये
विशेषतः उष्माघात कक्ष हा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उघडण्यात येतो. दरवेळी तो मे महिन्या दरम्यान सुरु करण्यात येतो. मात्र यावेळी एप्रिलमध्येच तो उघडण्याची शक्यता आहे. सध्या आरोग्य विभाग सल्ला देण्यात पुढे आहे. मात्र ग्रामीण पातळीवर अजूनही जनजागृती केल्या जात नसल्याचे दिसत आहे. वास्तविक उपचार करण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी जिल्हयात एक जिल्हा रुग्णालय, ३ उपजिल्हा रुग्णालय, १२ ग्रामीण रुग्णालय, ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र, २८० उपकेंद्रे आहेत.

बातम्या आणखी आहेत...