आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात सर्व जाती-धर्माचे लोक सण, उत्साह सलोख्यात साजरे करतात, हे एकात्मतेचे प्रतिक आहे. मात्र अलीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून युवा पिढीला चुकीचा इतिहास सांगितला जातो, ही बाब समाजहिताची नाही. त्यामुळे सर्वांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी केले.
अक्षय तृतीया व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर येथील भ्रातृ मंडळात शांतता समितीची बैठक पार पडली. त्यावेळी चावरिया बोलत होते. शांतता व सुव्यवस्था बाळगणे, ही पोलिसांसोबतच जनतेची देखील जबाबदारी आहे. युवा पिढीला जातीय दंगलीपासून परावृत्त केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रत्येकाने प्रामाणिक राहावे, गावात सलोखा टिकवून ठेवावा, असे आवाहन अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांनी केले. समाजात सलोखा असला तर कधीही अशांतता पसरणार नाही, किंबहुना ही आता प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे मत उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे अशांतभाई वानखेडे, हाजी रशीदखाँ जमादार, मनोहरराव पाटील, अॅड.मजिद कुरेशी यांनी आपले विचार व्यक्त केले.
प्रास्ताविक शहर ठाणेदार विजयसिंह राजपूत यांनी केले. बैठकीला उपविभागीय पोलिस अधिकारी अभिनव त्यागी, तहसीलदार राजेश सुरडकर, मुख्याधिकारी रमेश ढगे, पोलिस निरीक्षक एफ.सी.मिर्झा, दसरखेड एमआयडीसी ठाणेदार आनंद महाजन यांच्यासह विविध राजकीय तथा सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीचे संचालन रवींद्रसिंह राजपूत यांनी तर आभार सहायक पोलिस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.