आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडाळी येथील घटना:अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी; परिसरात भीतीचे वातावरण

मेहकर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतात काम करत असलेल्या एका शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना २७ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास वडाळी शिवारात घडली. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे शेतकरी व शेत मजुरांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम भागातील वडाळी येथील चाळीस वर्षीय विनोद सातपुते हा शेतकरी शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आपल्या शेतात काम करण्यासाठी गेला होता. काम करीत असतानाच दुपारी दोन वाजेच्या सुमारास पिकात दडून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर अचानक प्राण घातक हल्ला चढवला.

या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या शेतकऱ्यास येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले होते. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे या ठिकाणी प्रथमोपचार करून त्याला पुढील उपचारासाठी बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...