आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:शेतरस्त्यासाठी मोहखेड येथील शेतकऱ्यांचे ट्रॉलीत बसून उपोषण ; शेतरस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण केले

हिवरा आश्रम7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहखेड येथील गट नंबर २९ मधील जाणारा शेतरस्ता मोकळा करून देण्यात यावा, या मागणीसाठी मोहखेड येथील शेतकऱ्यांनी आज २० जून पासून मेहकर चिखली रस्त्यावर ट्रॅक्टर ट्रॉलीत बसून उपोषणास सुरूवात केली आहे.

गट क्रमांक २९ मधील जाणाऱ्या शेतरस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांना शेतातील कामे करण्यास अडचणी जात आहेत. याच शेतरस्त्यासाठी २७ फेब्रुवारी २१०९ मध्ये शेतकऱ्यांनी उपोषण केले होते. त्यावेळी तत्कालीन तहसीलदार काकडे यांनी शेतरस्ता खुला करून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु चार वर्षाचा कालावधी उलटून गेला असतांना देखील अद्याप शेत रस्ता खुला करून देण्यात आला नाही. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी १७ मे २०२२ रोजी शेत रस्ता खुला करण्याचे आदेश दिले होते.

एवढेच नव्हे तर पोलिस संरक्षणासाठी पत्र सुध्दा दिले होते. हा सर्व खर्च शेतकऱ्यांनी वर्गणी करून भरला होता. परंतु तरीही तहसीलदारांनी रस्ता मोकळा करून दिला नाही. या शेतरस्त्यावर शंभर एकर शेती अाहे. परंतु शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे जमिनी पडीक पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच सध्या पेरणी पाण्याचे दिवस असल्यामुळे आणी शेत रस्ता अडवल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीची कामे करण्यास अडचणी जात आहेत. त्यामुळे तातडीने शेतरस्ता मोकळा करून देण्यात यावा, या मागणीसाठी मोहखेड येथील शेतकऱ्यांनी ट्रॉलीमध्ये बसून उपोषणास सुरूवात केली आहे. या उपोषणाला शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वाळुकर, सभापती दिलीप देशमुख, राष्ट्रवादीचे संजय वडतकर, सिद्धेश्वर पवार, समाधान म्हस्के व माजी उपसभापती बबन लहाने यांनी उपोषण मंडपाला भेट देवून आपला पाठिंबा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...